देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ५ लाखांच्या जवळ; २४ तासात १७ हजारपेक्षा जास्त रुग्णांची नोंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतात कोरोनाचा कहर वाढत आहे. कोरोनाबाधित रुगणांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. मागील २४ तासांत कोरोनाबाधितांची एका दिवसातील सर्वाधिक, म्हणजे सुमारे १७ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली. या नव्या रुग्णांनंतर देशातील कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ९० हजार ४०१ इतकी झाली आहे. तर दुसरीकडे मृतांची संख्याही १५ हजारांच्या पुढे पोहचली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार मागील २४ तासात १७ हजार २९६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या संख्या ४ लाख ९० हजार ४०१वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे मागील २४ तासात ४०७ जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची एकूण संख्या १५ हजार ३०१ इतकी झाली आहे.

कोरोनाबाधितांची संख्या १४ हजारांहून अधिक वाढण्याचा हा सलग ७ वा दिवस होता. २० जून रोजी १४ हजार ५१६, २१ जून रोजी १५ हजार ४१३, २२ जून रोजी १४ हजार ८२१, २३ जून रोजी १४ हजार ९३३, तर २४ जून रोजी रुग्णांच्या संख्येत १५ हजार ९६८ रूग्णांची वाढ झाली. कोरोना संसर्गाच्या प्रकरणांत २० जूनपासून १ लाख रुग्णांची भर पडली असून, १ जूनपासून रुग्णसंख्या २.८२ लाखांहून अधिक वाढली आहे. दरम्यान, देशात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले असून ते ५७.४३ टक्के झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. सध्या एक लाख ८९ हजार ४६३ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर दोन लाख ८५ हजार ६३७ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment