हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मोदी सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळ फॉर इकॉनॉमिक अफेअर्स (CCEA) ने उसाच्या रास्त आणि लाभदायक किमतीमध्ये (FRP) 15 रुपयांनी वाढ करून 305 रुपये प्रति क्विंटल केली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा ५ कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.
एफआरपी हा साखर कारखान्यांना शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी करण्यासाठी लागणारा किमान दर आहे. सरकार ऊस (नियंत्रण) आदेश, १९६६ अंतर्गत एफआरपी निश्चित करते. यापूर्वी उसाचा भाव (एफआरपी) २९० रुपये प्रतिक्विंटल होता तो आता ३०५ रुपये प्रतिक्विंटल करण्यात आला आहे. सरकारने गेल्या आठ वर्षांत एफआरपीमध्ये ३४ टक्क्यांहून अधिक वाढ केली आहे.
Government approves Fair and Remunerative Price of sugarcane payable by Sugar Mills to sugarcane farmers for sugar season 2022-23. Highest ever Fair and Remunerative Price of Rs 305/qtl approved for Sugarcane Farmers: Cabinet Committee on Economic Affairs (CCEA)
— ANI (@ANI) August 3, 2022
एफआरपी वाढल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न जवळपास दुप्पट होईल, असे मंत्रालयाने म्हटले आहे. साखर हंगाम 2022-23 मध्ये, ऊस उत्पादन खर्च 162 रुपये प्रति क्विंटल असा अंदाज आहे, तर शेतकर्यांना 305 रुपये प्रति क्विंटल दिले जाईल, जे त्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा 88 टक्के अधिक आहे. चालू साखर हंगामात उसाचा भाव 290 रुपये प्रतिक्विंटल आहे.