हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक तरुण आज अधिकारी होण्यासाठी खूप कष्ट घेतात. दररोज बारा बारा तास अभ्यास करून प्रिजक्षाही देतात. या काळात त्यांना घरच्या परिस्थितीचा सामनाही करावा लागतो. मग अनेकजण खचून जाऊन अधिकारी होण्याची स्वप्ने सोडून देतात. मात्र, काही जण आपल्या जिद्दीच्या जोरावर कष्ट करून अभ्यास करून यश खेचून आणतात. असेच कष्ट उत्तराखंडमधील सितारगंज जिल्ह्यातील हिमांशू गुप्ता यांनी घेतले. प्रसंगी वडिलांच्या सोबत चहाच्या टपरीवर उभे रोवून त्यांनी चहा विकला. आणि अभ्यास करून IAS अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केलं आहे. पाहूया त्यांची यशोगाथा….
मूळच्या उत्तराखंडमधील सितारगंज जिल्ह्यातील राहणाऱ्या IAS हिमांशू गुप्ता यांनी गरिबी आणि अनेक अडचणींना सामोरे जात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आहे. आणि एक कर्तव्यदक्ष अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.
चहाच्या टपरीवर विकला चहा
उत्तराखंडमध्ये जन्मलेला हिमांशू गुप्ता यांच्या वडिलांचा चहाचा व्यवसाय आहे. हिमांशू आपल्या वडिलांसोबत चहाच्या गाडीवर चहा विकायला जात. त्यांनी चहा विकताना कधीही आपल्याला लोक काय म्हणतील याचा विचार केला नाही. चहाच्या टपरीवर त्यांचे कुटुंब चालत असे. आपल्या मुलाला चांगल्या सुविधा देऊ शकतील इतकी त्यांच्या वडिलांची कमाई नव्हती.
असा घेतला अधिकारी होण्याचा निर्णय
हिमांशू आपल्या वडिलांसोबत जेव्हा चहा विकायाला टपरीवर जात असत तेव्हा त्या ठिकाणी अनेक अधिकारी, शिक्षित लोक चहा पिण्यासाठी येत. त्याच्याकडे पाहिल्यानंतर हिमांशूलाही आपणही यांच्याप्रमाणे अधिकारी व्हायचे असे वाटत असे. अधिकार्याचे बोलणे, त्याचा सुटाबुटातील पेहराव पाहता हिमांशूनेही आपलनी अधिकारी व्हायचे असे मनाशी ठरवले आणि त्यांनी पुढे अभ्यास करून अधिकारी होण्याचा निर्णय घेतला.
दररोज रोजचा 70 किलोमीटरचा प्रवास
हिमांशू ज्या शाळेत शिकायचा होते ती शाळा त्यांच्या घरापासून 35 कि. मी. दूर होती. त्यामुळे शाळेत जाताना आणि येताना एकूण 70 कि. मी. चा प्रवास त्यांना करावा लागत. दररोज हिमांशू असावा प्रवास करून घरी येत. आणि घरी आल्यावर आपल्या वडिलांच्या चहाच्या टपरीवर चहा विकण्यासाठी जात असे.
चहा विकत असल्याने मित्रांकडून चायवाला अशी हिणवणी
हिमांशू शाळेत जाण्यापूर्वी चहाच्या टपरीवर वडिलांना कामात मदत करत. ते दररोज व्हॅनने शाळेत जायचे. एकदा त्यांच्या मित्रांनी त्यांना चहा विकताना पाहिले. आणि ते दररोज त्यांना चहावाला असे चिडवू लागले. मात्र, अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिलेल्या हिमांशूने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि वेळ मिळेल तेव्हा माझ्या वडिलांना कामात मदत केली.
UPSC परीक्षेत चौथ्यांदा बाजी
हिमांशू गुप्ता यांनी UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेसाठी सलग तीनवेळा प्रयत्न केला. पहिल्याच प्रयत्नात ते सिव्हिल सर्व्हिसेससाठी पात्र ठरले पण त्यांची फक्त IRTS साठी निवड झाली. तरीही त्यांनी तयारी सुरू ठेवली आणि 2019 च्या यूपीएससी परीक्षेत ते IPS झाले. शेवटच्या चौथ्या प्रयत्नात ते UPSC सिव्हिल सर्व्हिसेससाठी हजर झाले आणि संपूर्ण भारतातून 304 रॅंक मिळवत त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत IAS अधिकारी म्हणून निवड झाली.
चहावाला ते कॉलेजचा टॉपर विद्यार्थी
पुढे जाऊन हिमांशूनी पर्यावरण शास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आणि आपल्या बॅचमध्ये टॉप केले. हिमांशु यांच्याकडे परदेशात PHD करण्याचा पर्याय होता पण त्यांनी भारतात राहून सिव्हिल सर्व्हिसेसचा अभ्यास करणे पसंत केले. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी हिमांशू एका सरकारी कॉलेजमध्ये रिसर्च स्कॉलर म्हणून रुजू झाले. यामाध्यमातून त्यांना केवळ स्टायपेंड मिळण्यास मदत झाली नाही तर नागरी सेवेच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी शैक्षणिक वातावरण देखील मिळाले.