Saturday, March 25, 2023

हिमांश कोहलीने नेहा कक्कर बरोबरच्या ब्रेकअपवर तोडले मौन तो म्हणाला-“ती टीव्हीवर रडली,आणि सर्वांना खात्री पटली…”

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर तिच्या धमाकेदार गाण्यांमुळे बर्‍याचदा चर्चेत असते.तिची गाणी नेहमीच सोशल मीडियावर मोठी चमक उमटवतात. पण यावेळी मात्र नेहा तिच्या गाण्यांमुळे नाही तर तिच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आली आहे. खरं तर, नेहा कक्करचा माजी प्रियकर हिमांश कोहलीने तीच्याबद्दल आणि त्यांच्या नात्याबद्दलचा खुलासा केला आहे आणि म्हटले आहे की आपल्याला तिच्याशी लग्न करायचे आहे.इतकेच नव्हे तर नेहा कक्करनेच त्याच्यासोबत ब्रेकअप केल्याचे हिमांशने सांगितले. या अभिनेत्याने आपल्या मुलाखतीदरम्यान सांगितले होते की तो त्याच्या ब्रेकअपबद्दल गप्प आहे, म्हणूनच लोकं त्याच्याबद्दल गैरसमज निर्माण करतात.

बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत हिमांश कोहलीने नेहा कक्कर बरोबरच्या ब्रेकअपबद्दल बोलताना सांगितले की,”हा ब्रेकअप माझ्या बाजूचा नव्हता, पण जेव्हा अटकळ सुरू झाली तेव्हा सर्व गोष्टी विचित्र दिसू लागल्या. माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्प्यातला हा एक काळ होता. आज सर्व काही ठीक झाले आहे, पण एक काळ होता जेव्हा संपूर्ण जग मला सोशल मीडियावर शाप देत होता. कोणालाही सत्य जाणून घ्यायचे नव्हते आणि मी प्रत्येकाच्या नजरेत खलनायक झालो होतो.मला फार वाईट वाटले कारण नेहाने सांगितलेल्या गोष्टींच्या आधारे लोकांनी माझ्याबद्दलचे त्यांचे मत तयार केले”.

- Advertisement -

हिमांश कोहलीने नेहाविषयी पुढे सांगितले, “ती टीव्ही कार्यक्रमात रडली आणि सर्वांना खात्री झाली की मी चूक आहे. मलाही रडायचे होते, पण मी शूर होतो. मी माझी बाजू समोर ठेवली. मला बरेच काही सांगायचे होते. एक वेळ अशी होते की,मी सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी बरेच लिहिले होते.पण मी काही वेळ थांबलो आणि काही तासांनी माझा विचार बदलला, कारण ती माझ्यावर प्रेम करणारी व्यक्ति होती”.हिमांशने पुढे सांगितले की ब्रेकअप करण्याचा निर्णय त्याचा नाही तर नेहाचा होता. तो म्हणाला, “त्या वेळी बर्‍याच गोष्टी घडल्या ज्याबद्दल मला बोलण्याची इच्छा नाही. मी एवढेच सांगू शकतो की तिला या नात्याचा पाठपुरावा करायचा नव्हता, म्हणून आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला.”