हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपकडून सावरकरांचा कामापुरताच वापर होत आहे. असा टोला शिवसेनेनं सामनामधून भाजपाला लगावला आहे. शिवसेनेसमोर पेच निर्माण होईल असे त्यांना वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. शिवसेनेसमोर पेच निर्माण होणार नाही, पण तुम्ही जे ढोंग उभे केले आहे. त्या ढोंगाच्या पेकाटात मात्र नक्कीच लाथ बसेल. भाजपला वीर सावरकरांचा आलेला पुळका खोटा आहे, असं म्हणत शिवसेनेनं भाजपावर टीकेचे बाण सोडले आहेत.
वीर सावरकरांच्या विषयावर सरकारची कोंडी करू, असे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील मंडळींनी जाहीर केले. याचा अर्थ स्पष्ट आहे. सावरकर हा भाजपसाठी आदर किंवा श्रद्धेचा विषय राहिला नसून फक्त राजकारणाचा विषय बनला आहे, असं शिवसेनेनं म्हटले आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजपावर निशाणा साधला आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.