Home Loan Rate Hike: होम लोन महागल्यानंतर जाणून घ्या आपल्याकडे कोणकोणते पर्याय असतील ???

Rapo Rate Hike
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Home Loan Rate Hike : आता होम लोन वरील व्याजदरात वाढ होते आहे. अनेक बँका तसेच हाऊसिंग फायनान्स कंपन्या आपल्या ग्राहकांना ईमेल तसेच SMS द्वारे होम लोनच्या व्याजदरात वाढ झाल्याची माहिती देत आहे. बँकांच्या या निर्णयामुळे होम लोन घेणाऱ्या ग्राहकांच्या EMI मध्ये देखील वाढ होणार आहे. आता असा प्रश्न उपस्थित होतो आहे कि यानंतरही व्याजदरात वाढ होणार का ? मात्र हे आत्ताच सांगणे फार घाईचे ठरेल. अनेक तज्ञ म्हणतात की, RBI ने रेपो दरात सध्या फक्त 40 बेसिस पॉईंटने वाढ केली आहे. त्यामुळे कदाचित येणाऱ्या काळात व्याजदर आणखी वाढू शकतील ज्यामुळे EMI आणखी महागतील.

What Is the Current Interest Rate on a Home Loan in South Africa? |  MortgageMarket

आता ग्राहकांसमोर कोण-कोणते पर्याय असतील ?

जेव्हा होम लोनवरील व्याजदर वाढतात आणि भविष्यात ते आणखी वाढण्याची शक्यता असते, तेव्हा ग्राहक फ्लोटिंग रेट होम लोनमधून फिक्स्ड रेटच्या होम लोनवर स्विच करू शकतात. यामध्ये व्याजदर वाढीचा कोणताही परिणाम होणार नाही. मात्र, इथे ही गोष्ट लक्षात घ्या कि, फिक्स्ड रेटच्या होम लोनचे व्याजदर हे फ्लोटिंग रेट होम लोनवरील व्याजदरांपेक्षा महाग असतात. ज्यामुळे आपल्याला जास्त EMI भरावा लागेल. मात्र व्याजदरातील या बदलाचा आपल्या खिशावर कोणताही परिणाम होणार नाही. Home Loan Rate Hike

Bank charging high interest on home loan? Follow this method to reduce your  EMI

‘या’ बँका फिक्स्ड रेटने देत आहेत होम लोन

एक्सिस आणि एचडीएफसी या दोन बँका ग्राहकांना फिक्स्ड रेटने होम लोन (Home Loan Rate Hike) देत आहेत. एक्सिस बँक 12 टक्के वार्षिक व्याजदराने फिक्स्ड रेट असलेले होम लोन देत आहे. मात्र, या फिक्स्ड रेटच्या होम लोनवर स्विच करण्यापूर्वी आपल्याला दीर्घ कालावधीसाठी जास्त EMI तर भरावा लागणार नाही ना याची खात्री करा. व्याजदर कमी झाल्याने त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. एचडीएफसी बँकेच्या फिक्स्ड रेट असलेल्या होम लोनचे व्याजदर हे 7.40 टक्के ते 8.20 टक्क्यांपर्यंत असतात. जे कर्जाच्या रकमेवर अवलंबून असतात. तसेच, फिक्स्ड रेट असलेल्या होम लोनचा व्याजदर फक्त 2 वर्षांसाठी व्हॅलिड असतो, त्यानंतर बँक व्याजदरांचे पुनरावलोकन करते. Home Loan Rate Hike

Interest rates explained: Five common home loan questions answered

अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या :  https://www.axisbank.com/retail/loans/home-loan/axis-bank-home-loan/interest-rates-charges

https://www.hdfcbank.com/personal/borrow/popular-loans/home-loan/rate-of-interest

हे पण वाचा :

Mukesh Ambani च नाही तर त्यांचे शेजारीही आहेत अब्जाधीश, त्यांच्या शेजारी कोण-कोण राहतात ते पहा

Nexon EV Max : एका चार्जमध्ये 437 किमी धावणार Tata ची ‘ही’ गाडी, किंमत किती असेल ते पहा

Cardless Cash Withdrawl : आता डेबिट-क्रेडिट कार्डशिवाय काढता येणार कॅश, संपूर्ण प्रक्रिया पहा

JioPOS Lite App : Jio Recharge द्वारे घर बसल्या पैसे कमावण्याची संधी !!!

Google Play Store Policy : आजपासून ‘कॉल रेकॉर्डिंग’ चे सर्व App होणार बंद