अहमदाबाद | अहमदाबादमधील वैष्णवी देवी सर्कलजवळील के.डी. रुग्णालयात केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शहा यांच्या मानेच्या मागच्या बाजूला असणारी एक गाठ काढण्यात आली असल्याचे परिपत्रक रुग्णालयाने जरी केले आहे.
मागील काही दिवसांपासून शाह याना मानेत त्रास जाणवत होता . ‘आज सकाळी नऊच्या सुमारास शहांवर ‘लिपोमा’ची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती केडी रुग्णालय व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
दरम्यान शस्त्रक्रिया करण्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच मंगळवारी रात्रीच अमित शाह यांनी दिल्लीमध्ये जम्मू काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेणारी बैठक घेतली. त्यानंतर ते गुजरातला रवाना झाले.