चित्रा वाघ यांच्या दाव्याप्रकरणी गृहमंत्र्यांनी केला ‘हा’ खुलासा; म्हणाले की,

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना आमदार संजय राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली. यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुणे येथे प्रतिक्रिया दिली. राठोड प्रकरणी पुणे पोलीस तपास करत आहेत. त्यामुळे क्लिन चिट देण्याचा संबंधच नाही, असा खुलासा पाटील यांनी केला.

पुणे येथील पूजा चव्हाण या मुलीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी शिवसेनेचे नेते संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आहे. दरम्यान आज राठोड यांना क्लीनचिट देण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर भाजप नेत्या वाघ यांनी पत्रकार परिषद घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर या प्रकरणी वाघ यांच्या गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी खुलासा करावा, अशीही मागणी केली आहे. त्यांच्या मागणीवर गृहमंत्री पाटील यांनी खुलासा केला.

मंत्री पाटील म्हणाले कि, पुणे येथे वानवडी भागात पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी शिवसेना आमदार संजय राठोड प्रकरणी पुणे पोलीस तपास करत आहेत. त्यामुळे क्लिन चिट देण्याचा संबंधच असल्यामुळे या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून पुढेही केला जाणार असल्याचे मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment