हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Honda : नवीन होंडा सिटीनंतर Honda कडून आता लवकरच आणखी कर लाँच केली जाणार आहे. हि एक हायब्रीड कार असेल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. 2022 होंडा CR-V असे तिचे नाव असेल. कंपनीकडून या नवीन जनरेशन CR-V चा फोटो टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या कारमध्ये नवीन CR-V हायब्रिड इंजिन दिले जाईल.
या 2022 होंडा CR-V च्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, होंडा ने याबाबत असा दावा केला आहे की, या नवीन CR-V मध्ये स्पोर्टियर ड्रायव्हिंग एक्सपीरियंससाठी एडव्हान्स हायब्रिड तंत्रज्ञान इंजिन देण्यात येईल, जे जास्त उर्जा निर्माण करेल. Honda पुढे ने सांगितले आहे की, ते या वर्षी एक नवीन होंडा पायलट देखील लाँच करणार आहे.
ही नवीन Honda CR-V जुन्या मॉडेलपेक्षा खूपच आकर्षक असेल. तसेच पुढील काही दिवसांमध्ये त्याच्या डिझाइन विषयीची आणखी माहिती उघड होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच या वर्षा अखेरीपर्यंत होंडा कडून या नवीन जनरेशनचे CR-V हायब्रीड्स देखील लाँच केले जाणार आहेत.
2022 Honda CR-V आधीपेक्षा खूप शार्प आणि स्पोर्टियर दिसते. क्रोम ट्रिम्सच्या तुलनेत यामध्ये जास्त गडद एक्सेंट मिळतील. प्रोलॉग इलेक्ट्रिक क्रॉसओवरमध्ये दाखवल्याप्रमाणे या नवीन मॉडेलवरील हेडलॅम्प आणखी आकर्षक बनवले गेले आहेत. बोल्ड मेश पॅटर्नसह पुढील ग्रिलमध्ये प्रचंड स्लॉट आहेत तर खालच्या कोपऱ्याला एअर इंटेक सह डार्क एक्सेंट मिळतात. या नवीन मॉडेलमध्ये डोअर पॅनलवर विंग मिरर देखील बसवण्यात आले आहेत.
या कारच्या साइड प्रोफाईलबद्दल सांगायचे झाले तर, यात स्लीक क्रिझ आणि स्पोर्टी स्टाईलने नवीन डिझाइन केलेले अलॉय व्हील्स मिळतील. याच्या मागील बाजूस, नवीन होंडा CR-V साठी ऑटोमेकर उच्च-स्थितीतील टेललाइट डिझाइन थीमसह सुरू आहे. मात्र, एल-आकाराचे टेललाइट्स रिवाइज्ड स्टाइलसह येतात. खालच्या बंपरवरील सिल्व्हर एक्सेंट अशा प्रकारे स्टाइल केले गेले आहे की तो एक एग्जॉस्ट आहे असे पाहणाऱ्याला वाटेल. मात्र, प्रत्यक्षात तसे नाही.
कंपनीच्या अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://automobiles.honda.com/cr-v
हे पण वाचा :
Share Market : ‘या’ शेअर्सने 1 वर्षात गुंतवणूकदारांना दिला तब्ब्ल 250% रिटर्न !!!
Gold Price Today : सोन्यामध्ये घसरण तर चांदीमध्ये किंचित वाढ
FD Rate : आता ‘या’ स्मॉल फायनान्स बँकेने देखील FD च्या दरात केली वाढ !!!
HDFC Bank च्या रिकरिंग डिपॉझिट्सवर आता मिळणार जास्त व्याज, नवीन दर पहा
खुशखबर !!! आता Post Office मध्ये सुरु होणार ‘या’ सुविधा