दिल्लीत जा नाही तर मसनात जा..पण ओबीसींना आरक्षण द्या; चंद्रकांतदादांची ‘मविआ’वर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या सध्या राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या आरक्षणाच्या मुद्यांवरून आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवर व महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. “मराठा आरक्षणासह ओबीसी आरक्षणाकडे या सरकारने दुर्लक्ष केले. या सरकारलाच ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही. खासदार आहात ना मग दिल्लीत जा नाही तर मसनात जा पण ओबीसींना आरक्षण मिळवून द्या, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकारवर केली आहे.

ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी आज भाजप नेत्यांकडून मुंबईतीळ मंत्रालयावर महाविकास आघाडी सरकारविरोधात धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले कि, पोलिसांच्या दबावतंत्राचा वापर करून सरकार हे आमचे हे आंदोलन, मोर्चा चिरडण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, ओबीसी आरक्षणासाठी आम्ही मंत्रालयात धडकणारच आहोत.

ओबीसी राजकीय आरक्षणासाठी दोन वर्षापूर्वी ट्रिपल टेस्ट करा असे कोर्टाने सांगितले होते. मात्र, महाविकास आघाडीच्या हे लक्षात आले नाही. राज्य सरकारने ओबीसींना फसवले याचा राग ओबीसींच्या मनात आहे. त्यांचा भाजपावर विश्वास आहे. मध्यप्रदेशमध्ये आरक्षण मिळत असेल तर मग महाराष्ट्रात का नाही? असा सवालही चंद्रकांतदादांनी केला.

पवार साहेबांनी लोकांना गूळ दाखवणे ही मोठी परंपरा

यावेळी चंद्रकांतदादांनी शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, शरद पवार साहेबांनी लोकांना गूळ दाखवणे आणि फसवणे याची मोठी परंपरा आहे. त्यामुळे त्यांच्या गूळ दाखवण्याला ओबीसी समाज भीक घालणार आहे. महाविकास आघाडी आरक्षण देणार नाही हे जनतेला समजले असून ओबीसी समाज आता संतप्त झाला आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

पाटील, मुनगंटीवार, दरेकर, पडळकर पोलिसांच्या ताब्यात

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपने आक्रमक भूमिका घेत मंत्रालयावर धडक मोर्चा काढला. मात्र, भाजप कार्यालयातच पोलिसांनी भाजप नेत्यांना व मोर्चाला रोखले. याशिवाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार गोपीचंद पडळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Leave a Comment