मुंबई । पोर्नोग्राफी प्रकरणात शिल्पा शेट्टीचा नवरा आणि उद्योगपती राज कुंद्राच्या अडचणी वाढतच आहेत. पॉर्न चित्रपट बनवण्यासाठी आणि त्यानंतर मोबाईल अॅप्सच्या माध्यमातून विक्री केल्याबद्दल राज कुंद्राला 27 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर आता या प्रकरणात त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्याही अडचणी वाढत आहेत.
एकीकडे राज कुंद्रा पोलिस कोठडीत आहे, तर दुसरीकडे गुन्हे शाखा शिल्पा शेट्टीची सतत चौकशी करत आहे आणि एका न्यूज पोर्टलच्या रिपोर्टनुसार आता मुंबई गुन्हे शाखा पुढील तपास करण्यासाठी राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्या जॉईंट अकाउंटची तपासणी करीत आहे.
शिल्पाकडे या जॉईंट अकाउंटमधून करण्यात आलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय व्यवहारांबाबत चौकशी केली गेली. पोलिसांना संशय आहे की राजच्या या खात्यातून केनरिन लिमिटेडमध्ये व्यवहार झाले आहेत जे कि राज कुंद्राचा मेहुणा प्रदीप बक्षी याच्या मालकीची आहे. मुंबईतील राज कुंद्राच्या मालमत्तांचा शोध घेताना पोलिसांना अंधेरी येथील वियान इंडस्ट्रीजच्या ऑफीसमधून एक सीक्रेट लॉकरही सापडला.
या प्रकरणात अधिक खोलवर जाण्यासाठी वियान इंडस्ट्रीज, आर्म्सप्राइम आणि हॉटशॉट अॅपचे फॉरेन्सिक ऑडिटिंग केले जात आहे. अनेक रिपोर्टमध्ये शिल्पा या प्रकरणात सहभागी असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी कुंद्राला मुख्य सूत्रधार म्हणून नाव दिले होते. राजविरोधात 4 फेब्रुवारी रोजी मुंबईच्या मालवणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
राज कुंद्रावर आयपीसीच्या कलम 420 (फसवणूक),34, 292 आणि 293 अन्वये आयटी कायद्यातील संबंधित कलम आणिइनडीसेंट रिप्रेजेंटेशन ऑफ वुमन (प्रोहिबिशन) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.