केरळने कोरोनाला केलं काबूत, कोरोनावर नियंत्रण मिळवणारे देशातील पहिले राज्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । देशात सर्वात पहिला कोरोना व्हायरसची लागण झालेला रुग्ण केरळमध्ये सापडला होता. त्यानंतर संपूर्ण देशात वेगवेगळ्या मार्गाने कोरोनाचा विषाणू फोफावत गेला. ३० जानेवारीला पहिला कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर केरळ सरकारने वेळीच धोका ओळखत पाऊल उचलायला सुरुवात केली. त्याचाच परिणाम म्हणजे देशातील अन्य राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या रोज वाढत असताना केरळमध्ये आता कोरोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण अवघे ३ ते ४ झाले आहे. केरळने करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येचा आलेख कसा कमी केला? त्यावर कसे नियंत्रण मिळवले? हे समजून घेणे महत्वाचे आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

४ फेब्रुवारीला केरळने Covid-19 राज्यासाठी धोकादायक असल्याचे जाहीर केले. खबरदारी म्हणून मास्क, ग्लोव्हज, व्यक्तीगत सुरक्षा उपकरणे आणि औषधांची खरेदी केली. जिल्हा रुग्णालयांना आयसोलेशन वॉर्डची व्यवस्था करायला सांगितली. केरळने सर्वप्रथम कोरोना चाचण्यांचा वेग वाढवून करोनाची लागण झालेल्या रुग्णांची ओळख पटवली. त्यानंतर रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना शोधून काढले व सक्तीचा २८ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी, याची प्रभावी अंमलबजावणी केली. जागतिक आरोग्य संघटनेचा क्वारंटाइनसाठी जो कालावधी आहे. त्यापेक्षा दुप्पट दिवसांचा क्वारंटाइन कालावधी ठेवला. महत्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व मजबूत सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमुळे शक्य झाले.

३० जानेवारीला केरळमध्ये कोरोना व्हायरसचा एक रुग्ण होता. १३ एप्रिलला ही संख्या ३७८ आहे. २ जणांचा मृत्यू झाला आहे. १९८ कोरोनाग्रस्त पूर्णपणे बरे झाले आहेत. २७ मार्चला केरळमध्ये कोरोनाचे सर्वाधिक ३९ रुग्ण आढळले. १२ एप्रिलला म्हणजे २ दिवसांपूर्वी संपूर्ण राज्यात अवघे दोन कोरोनाग्रस्त आढळले. १८ जानेवारीला केरळच्या आरोग्य मंत्रालयाने Covid-19 चा अलर्ट जाहीर केला व परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरु केली.

आंतरराष्ट्रीय प्रवाशांना एक हेल्थ कार्ड दिले गेले. ज्यामध्ये त्यांच्याकडून प्रवासाची हिस्ट्री आणि अन्य आजार याबद्दलची माहिती भरुन घेतली जायची. विमानतळावर रुग्णवाहिका आणि जिल्हा रुग्णालयात इमर्जन्सीची व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली. ताप, सर्दी आणि घशाचा त्रास अशी लक्षणे असलेल्या रुग्णांना तात्काळ कोरोनासाठी बनवण्यात आलेल्या वॉर्डमध्ये हलवण्यात यायचे. अशा प्रकारच्या उपायोजना आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करुन केरळने कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

हे पण वाचा –

३० एप्रिल ऐवजी मोदींनी ३ मे पर्यंत का वाढवला लॉकडाउन, हे आहे कारण

कहर कोरोनाचा! राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा २ हजार ४५५ वर

आणि माकडांनी स्विमिंगपूलवर ‘अशी’ केली मस्ती, व्हिडिओ व्हायरल

खोल समुद्रात लपले आहे कोरोनावरचे औषध? पहा काय म्हणतायत अभ्यासक

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ??

 

Leave a Comment