Aadhar card मध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख किती वेळा बदलता येईल ??? अशाप्रकारे जाणून घ्या

Aadhar card
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Aadhar card  हे भारत सरकारद्वारे भारतातील नागरिकांसाठी जारी केले जाणारे ओळखपत्र आहे. त्यामध्ये एक खास 12 अंकी क्रमांक असतो. जो भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून (UIDAI) जारी केला जातो. सध्या हा आधार कार्ड क्रमांक हा आपली ओळख पटवण्यासाठी आवश्यक असलेले डॉक्युमेंट बनला आहे.

UIDAI withdraws notification asking people to not share Aadhaar photocopy

याशिवाय आपल्याला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेता येणार नाही. जवळपास प्रत्येक सरकारी कामासाठी आपल्याकडे Aadhar card क्रमांक असणे अत्यंत आवश्यक बनले आहे. बँकेत खाते उघडण्यापासून ते एलपीजी सिलेंडरवर सबसिडी मिळवण्यासाठी Aadhar card आवश्यक आहे. आता तर पॅन कार्डशी आधार लिंक करणेही बंधनकारक करण्यात आले आहे.

हे लक्षात घ्या कि, UIDAI कडून Aadhar card मध्ये बदल करण्याची सुविधा दिली जाते. आता आधारमध्ये नावापासून ते आपल्या पत्त्यापर्यंतच्या दुरुस्त्या करणे खूप सोपे झाले आहे. आता आपल्या आधार कार्डमधील नावात, जन्मतारीख किंवा पत्त्यामध्ये काही चुका असतील तर त्या आपल्याला सहजपणे बदलता येतील. मात्र हे बदल किती वेळा करता येतील याची माहिती करून घ्यावी लागेल. आज आपण आधारशी संबंधित अशाच काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती जाणून घेणार आहोत.

Aadhaar update: Address change process changed. Details here | Mint

आधार किती वेळा बनवता येईल ???

कोणत्याही नागरिकाला त्याच्या संपूर्ण आयुष्यात एकदाच आधार क्रमांक दिला जातो. हा 12 अंकी क्रमांक भारतातील व्यक्तीची ओळख आणि पत्त्याचा पुरावा आहे. त्यामध्ये संबंधित व्यक्तीची संपूर्ण माहिती नोंदवलेली असते. त्यामध्ये त्याचे नाव, पालकांचे नाव, वय, पत्ता इत्यादी माहिती असते. यामध्ये आपल्या नावात काही चुका झाल्या असतील तर त्या बदलता येतील. मात्र, UIDAI कडून त्यासाठी काही मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. Aadhar card

किती वेळा चूक सुधारता येईल ???

UIDAI कडून कोणत्याही आधार कार्ड धारकासाठी Aadhar card मधील पत्ता बदलण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. UIDAI नुसार, आता आधार कार्डधारकाला फक्त दोनदाच पत्ता बदलता येईल. तसेच, आधारमधील जन्मतारीख देखील फक्त एकदाच बदलता येईल. यासोबतच आधार डेटाबेसमध्ये आपले नाव वारंवार बदलता येणार नाही.

Aadhaar card lost? How to get it back while being in Covid-19 lockdown |  Mint

बदल करण्यासाठी मोबाईल नंबर रजिस्टर्ड असावा लागेल

Aadhar card मध्ये बदल करण्यासाठी आपल्याकडे रजिस्टर्ड मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. आधारमध्ये कोणत्याही प्रकारचे अपडेट करण्यासाठी UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. येथे दुरुस्तीसाठी अर्ज करावा लागेल. यानंतर रजिस्टर्ड नंबर द्यावा लागेल. यानंतर रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो भरून लॉगिन केल्यानंतर, होमपेजवर जा आणि प्रोसीड टू अपडेट आधार यावर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन पेज उघडेल. नंतर नाव बदला पर्याय निवडा आणि सपोर्टिंग डॉक्यूमेंट स्कॅन करा आणि अटॅच करा. त्यानंतर सबमिट करा आणि ‘ओटीपी पाठवा’ हा पर्याय निवडा. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर OTP येईल. तो भरा. यानंतर OTP भरल्यानंतर नाव बदलाचा अर्ज सबमिट केला जाईल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला द्या : https://uidai.gov.in/

हे पण वाचा :

1000 कोटींच्या Money Laundering प्रकरणी ED कडून 10 क्रिप्टो एक्सचेंजची चौकशी – रिपोर्ट

Multibagger Stock : गेल्या 20 वर्षांत ‘या’ ऑटो कंपनीच्या शेअर्सने दिला 41,900 टक्के रिटर्न !!!

Bank of Baroda च्या ग्राहकांना धक्का, आता कर्जाचे EMI महागणार !!!

EPFO: जर नियोक्ता तुमच्या PF खात्यात पैसे टाकत नसेल तर काय करावे ???

Gold Price Today : रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात बदल !!! नवीन दर तपासा