हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Home loan : घर खरेदी करण्यासाठी लोकांकडून होम लोन घेतले जाते. हा एक सर्वात सोपा आणि लोकप्रिय पर्याय आहे. आपल्या स्वतःचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बहुतेक लोकांकडून होम लोन घेतले जाते. सर्व प्रकारच्या कर्जांमध्ये होम लोन हे सर्वात सुरक्षित आणि स्वस्त मानले जाते. मात्र, होम लोन घेतल्यानंतरही आणखी काही पैशांची गरज भासल्यास काय करता येऊ शकेल ???
यासाठी पर्सनल लोन घेण्याऐवजी होम लोनवर टॉप-अप करण्याचा सल्ला तज्ञांकडून दिला जातो. वास्तविक, होम लोन हे दीर्घकालीन कर्ज आहे. तसेच बँकांसाठी देखील ते सोयीस्कर असते. यामध्ये गरज पडल्यास ते टॉप अपच्या स्वरूपात अतिरिक्त रक्कम देखील देऊ शकतात. मात्र, टॉप अपसाठी आधीच home loan घेतलेले असणे आवश्यक आहे.
किती पैसे मिळतील ???
व्हॉईस ऑफ बँकिंगच्या संस्थापक अश्विनी राणा म्हणतात की,” होम लोन आणि टॉप-अपसह एकूण रक्कम मालमत्तेच्या मार्केट प्राईसच्या 70 टक्क्यांपेक्षा जास्त नसावी. मात्र, हे कॅल्क्युलेशन प्रत्येक बँकेनुसार वेगवेगळे असू शकतात. होम लोन घेतल्यानंतर काही महिन्यांनंतरच टॉप अप कर्जासाठी अर्ज करता येतो. तसेच ज्या बँकेतून home loan घेतले आहे त्याच बँकेत पहिल्यांदा टॉप अप लोनसाठी अर्ज करावा. मात्र जर ही सुविधा त्या बँकेत उपलब्ध नसेल तर इतर कोणत्याही बँकेत अर्ज करता येईल.
व्याज दर आणि कालावधी काय असेल ???
home loan हे दीर्घ कालावधीसाठी घेतले जाते आणि 10 वर्षांच्या दीर्घ कालावधीसाठी त्यावर टॉप अप देखील घेता येते. मात्र त्यासाठी काही अति असतील. टॉप अप कर्जावरील व्याजाची अट अशी आहे की त्याचा दर होम लोनच्या दरापेक्षा कमी नसावा. मात्र, सरासरी, त्याचा व्याज दर हा होम लोनच्या आसपासच राहतो. त्यामुळे पर्सनल लोनपेक्षा ते खूपच स्वस्त असते. काही बँकाकडून टॉप अप लोनवर ओव्हरड्राफ्टची सुविधा देखील दिली जाते. मात्र हे लक्षात घ्या कि, 20 लाखांपेक्षा कमी आणि 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त लोनसाठी ते उपलब्ध नसेल.
रक्कम कुठे वापरता येईल ???
home loan वर टॉप अप म्हणून मिळालेली रक्कम घर दुरुस्ती, फर्निचर किंवा त्याच्या विस्तारासाठी वापरता येईल. याशिवाय ही रक्कम मुलाच्या शिक्षणासाठी देखील वापरता येईल. अनेक बँका होम लोनवर दिलेल्या टॉप अपच्या वापरावर कोणतेही बंधन लादत नाहीत, ज्यामुळे आपल्या गरजेनुसार ही रक्कम हवी तिथे वापरता येईल.
टॅक्स सूट देखील मिळेल
होम लोनप्रमाणेच, आपल्याला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून त्याच्या टॉप अप लोनवर देखील सूट दिली जाते. यामध्ये आयकराच्या कलम 80C अंतर्गत, होम लोनच्या मूळ परतफेडीवर वार्षिक 1.50 लाख रुपयांपर्यंत सूट मिळेल. त्याच वेळी, 24B अंतर्गत व्याज पेमेंटवर वार्षिक 2 लाख रुपयांची टॅक्स सूट दिली जाते. जर home loan लिमिट या सवलतीपेक्षा जास्त नसेल तर टॉप अप लोनवरील मुद्दल आणि व्याज यांचा समावेश करून निर्दिष्ट मर्यादेपर्यंत टॅक्स सूट मिळवता येईल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला द्या : https://www.bankbazaar.com/home-loan/top-up-home-loans.html
हे पण वाचा :
Income tax :रोख रक्कम अन् सोन्याप्रमाणेच घरांच्या संख्येवरही काही मर्यादा आहेत का??? जाणून घ्या
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज घसरण, नवीन भाव तपासा
ITR refund संबंधित महत्वाचे 5 नियम समजून घ्या !!!
OnePlus 10T : OnePlusने लॉन्च केला दमदार मोबाइल; फक्त 19 मिनीटांत होणार फुल्ल चार्ज