हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Penny Stocks गुंतवणूक करण्याच्या अनेक पर्यायांमध्ये शेअर बाजार देखील एक आहे. याद्वारे लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून पैसे कमावता येतील. मात्र त्यासाठी योग्य वेळी गुंतवणूक करून संयम बाळगणे महत्वाचे ठरते. शेअर बाजारामध्ये अनेकदा कमी किंमतीचे शेअर्स मोठा नफा मिळवून देतात. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना जास्तीत जास्त पैसे कमवायचे असतात. अशा स्थितीत गुंतवणूकदारांचे लक्ष हे पेनी स्टॉकवर असते. मात्र पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे खरंच योग्य आहे का???
हे लक्षात घ्या कि, पेनी स्टॉकच्या कमी किंमती गुंतवणूकदारांना नेहमीच आकर्षित करतात. यातील काही कंपन्यांच्या शेअर्सची किंमत एक रुपयापेक्षा कमी आहे. मात्र हे शेअर्स लोकांना मालामाल करत असले तरीही यातील काही शेअर्स गुंतवणूकदारांनाचे नुकसान देखील करतात.
पेनी स्टॉक्स म्हणजे काय???
आज आपण Penny Stocks म्हणजे काय याविषयी माहिती घेउयात. शेअर बाजारात लिस्टेड असलेल्या छोट्या कंपन्यांच्या शेअर्सची किंमत कमी आहे. अशा शेअर्सना पेनी स्टॉक असे म्हंटले जाते. सहसा त्यांची किंमत 10 रुपयांपेक्षा कमी असते. इथे हे लक्षात ठेवा कि, सर्व स्टॉक एक्स्चेंजमध्ये या शेअर्सची किंमत वेगवेगळी असते. या शेअर्समध्ये लिक्विडीटी खूपच कमी असते. कारण कमी किंमतीमुळे लोकं कमी प्रमाणात भरपूर शेअर्स खरेदी करतात.
गुंतवणूक करताना काय चुका कुठे होतात???
शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करताना बहुतेक लोकं कंपनीच्या शेअर्सची किंमत आणि त्याचा रिटर्न पाहूनच पैसे गुंतवतात. अनेक वेळा असे केल्याने मोठे नुकसान सोसावे लागू शकते. मात्र Penny Stocks मध्ये गुंतवणूक करणे खूप जोखमीचे असते. कारण यातील एखादा शेअर बाजारात चांगला रिटर्न देत असला तरीही त्यामध्ये गुंतवलेले पैसे बुडण्याची शक्यता मात्र तशीच राहते.
Penny Stocks मध्ये पैसे गुंतवणे योग्य ठरेल का???
इथे हे लक्षात घ्या कि, कोणत्याही पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यासाठी फक्त शेअर्सची किंमत किंवा त्याचा रिटर्न बघितला जाऊ नये. यामध्ये गुंतवणूक करण्याआधी कंपनीची सखोल माहिती जाणून घ्या. त्याबरोबरच कंपनीचा व्यवसाय आणि व्यवस्थापनाबाबतही माहिती घ्या. याशिवाय त्या कंपनीवर कर्ज तर नाही ना हे देखील पाहावे. तसेच भविष्यासाठी त्या कंपनीच्या योजना काय आहेत हे देखील शोधले पाहिजे. अशा प्रकारे सर्व गोष्टी पाहूनच पेनी स्टॉकमध्ये पैसे गुंतवले गेले पाहिजेत.
किंमत ऑपरेट करणे सोपे
जेव्हा एखाद्या कंपनीच्या शेअर्सची विक्री थांबते किंवा कमी होते तेव्हा काही वेळा कंपनीचे प्रमोटर्स मोठ्या प्रमाणात शेअर्सची खरेदी करतात. यामुळे त्या शेअर्सची किंमत झपाट्याने वाढू लागते. ज्यामुळे लोकांना समजते की, या शेअर्सचे मूल्य वाढत आहे. मात्र प्रत्यक्षात अशा प्रकारे त्याची किंमत अन्यायकारकपणे वाढवली जात असते. अशा प्रकारे Penny Stocks ऑपरेट केले जास्त असल्याने त्यामध्ये जोखीम देखील वाढते.
पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना काय खबरदारी घ्यावी ???
Penny Stocks गुंतवणूक करताना खूप काळजी घेणे महत्वाचे आहे. तसेच वारंवार अप्पर किंवा लोवर सर्किट लागणाऱ्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करणे टाळले पाहिजे. असे शेअर्स सुरुवातीला चांगला रिटर्न देत असले तरीही ते मोठे नुकसान देऊ शकतात. कोणत्याही पेनी स्टॉकमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी, विश्लेषण करा आणि टार्गेट ठरवा आणि ते पूर्ण होताच पैसे काढून घ्या. यामध्ये जास्त लोभ फायद्याऐवजी नुकसान करू शकतो.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://indiancompanies.in/list-of-penny-stocks-in-india-2021/
हे पण वाचा :
Stock Tips : सणासुदीच्या हंगामात ‘या’ 6 कंपन्यांचे शेअर्स मिळवून देतील मोठा नफा, याबाबत तज्ञांचे मत जाणून घ्या
Bank FD : ‘या’ 102 वर्ष जुन्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा
Infosys चा भारतीय वंशाच्या व्यक्ती अन् मुलं असलेल्या महिलांना कामावर घेण्यास नकार?
WhatsApp ने युझर्सच्या सुरक्षेसाठी लाँच केले Screenshot Blocking फीचर, त्याविषयी जाणून घ्या
Share Market Holiday : साप्ताहिक सुट्ट्यांव्यतिरिक्त ऑक्टोबरमध्ये इतके दिवस शेअर बाजार राहणार बंद