शिंदे-फडणवीस अन् ठाकरे येणार पुन्हा एकत्र; नेमकं कारण काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. भाजप व शिंदे गटातील काही नेते महाविकास आघाडीतील नेते संपर्कात असल्याचे सांगत आहेत. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्र येणार असल्याने चर्चाना उधाण आले आहे. त्यांच्या होणाऱ्या भेटीमागचे नेमके कारण अजूनही गुलदस्त्यात आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढत चालल्या आहेत. कधी एकमेकांच्या घरच्या गणपतीच्या दर्शनासाठी, कधी शिवाजी पार्कातील दीपोत्सव, तर कधी एखाद्या एका उद्योजकाच्या समाजोपयोगी प्रकल्पासाठी अशा मिळून त्यांच्या तीन भेटी झाल्या होत्या. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मराठी अभिनेते प्रशांत दामले यांच्या साडेबारा हजाराव्या प्रयोगाच्या कार्यक्रमात एकत्र येणार आहेत.

सध्या जरी त्यांच्या या होणाऱ्या भेटींमागे राजकीय कारण सांगितले जात नसले तरी आगामी काळात मनसे शिंदे गट युती होण्याची शक्यता नाकरता येत नाही. अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपने माघार घ्यावी अशा आशयाचं पत्र राज ठाकरे यांनी लिहिण्यापूर्वीच एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. आणि त्यानंतर उमेदवार मागे घेण्यात आला. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महाविकास आघाडीविरोधात दुसऱ्या बाजूने मजबूत आघाडी देण्यासाठी मनसेला सोबत घेण्याचा शिंदे-फडणवीस प्रयत्न करताना दिसत आहेत.