Paytm द्वारे FASTag कसा खरेदी करायचा आणि बॅलन्स कसा पहायचा ? संपूर्ण प्रक्रिया सहजपणे समजून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सरकारने देशातील सर्व टोलनाक्यांवर FASTag अनिवार्य केले आहे. याद्वारे वाहनांच्या लांबच लांब रांगेतून सुटका होण्यासोबतच टोल भरणेही सोपे झाले आहे. ग्राहकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेले FASTag आपल्या प्लॅटफॉर्मवर Paytm विकतो. यामुळे खरेदी करणे सोपे तर होतेच शिवाय यासाठी वेगळे वॉलेट तयार करण्याची देखील गरज नाही.

Paytm ने आपल्या प्लॅटफॉर्मवरून आतापर्यंत सुमारे 1.24 कोटी FASTag विकले आहेत. देशात विकल्या जाणार्‍या एकूण FASTagपैकी हे प्रमाण सुमारे 30 टक्के आहे. या प्लॅटफॉर्मवरून FASTag खरेदी करणे देखील चांगले आहे. कारण तुम्हाला तुमचे पैसे इतर कोणत्याही वॉलेटमध्ये अडकवण्याची गरज नाही. गरजेच्या वेळी तुम्ही तुमचा FASTag सहज रिचार्ज करू शकता.

Paytm ग्राहकांना आपला FASTag रिचार्ज करण्यासाठी वेगळे वॉलेट डाउनलोड करण्याची गरज नाही. जर तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर FASTag रिचार्ज करायचे असेल तर तुम्ही ते UPI, बँक अकाउंट किंवा Paytm वॉलेटमध्ये असलेल्या रकमेसह भरू शकता.

Paytm वरून FASTag खरेदी करण्यासाठी, Wallet वर जा आणि MORE वर क्लिक करा. त्यानंतर FASTag Search करा आणि Buy FASTag वर जा. येथे तुम्हाला कार, जीप किंवा व्हॅनचा पर्याय टाकावा लागेल. यानंतर, तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमच्या वाहनाच्या इतर डिटेल्स टाकून रजिस्ट्रेशनची स्कॅन कॉपी अपलोड करा. आता डिस्ट्रिब्युशन ऍड्रेस एंटर करा आणि Buy बटणावर क्लिक करा. येथे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला FASTag मिळेल.

Paytm वरून FASTag बॅलन्स तपासणे देखील खूप सोपे आहे. तुम्ही Paytm.com वर जा आणि मॅनेज FASTag वर क्लिक करा. सर्व आवश्यक असलेले डिटेल्स भरून लॉग इन करा, आता तुमच्या समोर FASTag चे पेज उघडेल, ज्यामध्ये मागील सर्व पेमेंटचे डिटेल्स आणि बॅलन्स दाखविला जाईल. FASTag वापरल्याने, तुम्ही टोलवर होणारी गर्दी टाळाल आणि बराच वेळही वाचेल. याशिवाय पैसे भरण्यावर सूटही मिळते.

Leave a Comment