Wednesday, October 5, 2022

Buy now

“आजचा संघर्ष झाकी है… पिक्चर अभी बाकी है”; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक याच्या राजीनामा मागणीसाठी भाजपच्यावतीने आज मुंबईतील आझाद मैदानापासून मोर्चा काढण्यात आला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. राज्यातील ठाकरे दरकारने आतापर्यंत दाऊदच्या माणसांना मदत करणाऱ्यांचा राजीनामा का घेतलेला नाही तर मग हे सरकार काय दाऊदच्या इशाऱ्यावर चालत आहे काय? असे कोणाच्या दाढ्या कुरवळताय तुम्ही. तुम्ही मलिक यांचा राजीनामा घेतला नाही. आजचा संघर्ष तीव्र आहे. आजचा संघर्ष झाकी है और असली पिक्चर अभि बाकी है,” असा इशारा फडणवीस यांनी दिला.

भाजपच्या मोर्च्यानंतर पोलिसांनी भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर भाजप नेत्यांना ताब्यात घेत यलो गेट पोलीस ठाण्यात नेण्यात आले. काही वेळेनंतर त्यांना सोडून देण्यात आले. यावेळी फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस म्हणाले की, आजची कारवाई हि पोलिसांकडून आमच्यावर करण्यात आली आहे. काहीही आणि कितीही कारवाई केली तर आम्ही हार मानणार नाही. आम्ही मागे हटणार नाही. जोपर्यंत मलिक यांचा ठाकरे सरकार राजीनामा घेत नाही तोपर्यंत आम्ही आमचा संघर्ष सुरूच ठेवणार आहोत.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्हाला पोलिसांनी आता सोसून दिलेले आहे. तरीही आम्ही आमचा संघर्ष हा यापुढेही सुरूच ठेवणार आहोत. पाकिस्तान आणि दाऊद अशा धार्जीनांच्या विरोधात संघर्ष करू, असा इशारा फडणवीस यांनी सरकारला दिला.