2019 ची UPSC प्रिलिम देणार्यांसाठी  मन कि बात…??? 

UPSC Prelims
UPSC Prelims
स्पर्धापरिक्षा अभ्यासनीती, भाग 21 | नितिन बऱ्हाटे
तुम्ही जर 2019 साठी तयार करीत असाल तर पुढील गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत
वेळ – “The real problem is you think you have Time…!” इथुन पुढे फक्त पाचच महिने राहीले आहेत UPSC पुर्व परिक्षेसाठी, वेळ थांबत नाही म्हणुन अभ्यास‌ थांबवु नका.  इथुन मागच्या अभ्यासाचा आढावा घ्या आणि वेळेचे योग्य नियोजन करून उरलेल्या दिवसांचे नियोजन करा .
प्राधान्यक्रम पुर्व परिक्षेला – वैकल्पिक विषय आणि मुख्य परिक्षेचे घटक जेवढे झाले असतील तेवढे, आता त्याची तयारी थांबवा, आणि पुर्व परिक्षेच्या तयारीला प्राधान्यक्रम द्या. 
ठरवलेल्या गोष्टी वेळेत पूर्ण करण्याची जिद्द ठेवा, परिक्षेचे दोन तासांचे नियोजन दोन वर्षांच्या तयारीवर अवलंबून असते, त्यामुळे आकलन, लिखाण आणि अभ्यास यांचा वेळ ठरवून वेळेत पुर्ण करीत रहा. स्पर्धा वेळ आणि गतीशी आहे.
कमी वाचा पण उजळणी जास्त करा, प्रत्येक विषयाचे अभ्यास साहित्य ठरवुन घ्या आणि तेच पुन्हा पुन्हा वाचा. अभ्यासक्रमातील घटक अधिक प्राधान्याने वाचा. उजळणी वर विशेष भर द्यावा.
‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी स्थिती करु नये – अभ्यास साहित्य, अभ्यास मित्र आणि अभ्यास गुरु काळजीपूर्वक निवडा. पुढील पाच महिने तुमचा वेळ कुणाबरोबर, काय वाचण्यात आणि कोणाचे ऐकण्यात  गुंतवायचा यांचे भान ठेवा. कोणावरच विश्वास न ठेवण्यापेक्षा एका चांगल्या गुरु वर तरी श्रद्धा ठेवा.
ज्ञान वाटत रहा – सर्व इगो सोडून द्या, पुर्व पास होण्यासाठी जे जे करावे लागेल ते ते करा, जे समजले नाही ते समजे पर्यंत विचारत रहा, आणि समजलेलं पुढे पोहचविण्यासाठी वाट बघु नका. 
– don’t listen to too many people – they will spoil 
-ऐकावे जणाचे करावे मनाचे,  या प्रवासात स्वतः वर विश्वास असणे सर्वात महत्त्वाचे आहे 
स्वतः ला नेहमी अपडेट ठेवा, दररोजच्या चालु घडामोडी वर बारकाईने लक्ष ठेवून त्याची नोंद ठेवत रहा, महत्त्वाच्या समस्या वर विचारमंथन सुरू राहुद्या.
आॅनलाईन मृगजळ – आॅनलाईन अभ्यासाला मर्यादा आहेत, सगळ्याच वेबसाईट वरील सगळीच माहीती कायम महत्त्वाची वाटत राहील, ठराविक वृत्तपत्र/स्त्रोतच फाॅलो करीत रहा, गर्दीमध्ये हरवु नका. नको तेवढ्या इमेल सब्क्रिपश्नस् आणि फोटोकाॅपीची
रद्दी जमवु नका. वेळ आणि पैसा वाया जातो. 
कितीही कंटाळा आला तरी सराव चाचण्या सोडविल्या पाहिजेत, दररोज स्वतः यध्ये होणारी प्रगती लक्षात घेतली पाहिजे.
That’s it 
If you do follow the above steps 100% you will definitely clear this exam! Even if it is 99.9 percent you won’t clear it! 
तरीही तुमचं सिलेक्शन तुमच्या सातत्य, चिकाटी आणि आक्रमतेवर आहे, 
IF YOU THINK YOU CAN YOU ARE RIGHT, 
IF YOU THINK YOU CAN’T YOU ARE RIGHT AGAIN. 
Rules are simple – we should leave all our ego’s and give it the respect this exam deserves 
स्वतः मधील अधिकारी घडविण्यासाठी स्वतःच्या क्षमतांनां सर्वोच्च न्याय द्या 
तुमची स्पर्धा फक्त आणि फक्त तुमच्याशीच आहे. 
आम्ही तुमच्या सोबत कायम आहोत
“3 सेकंदावर विजय” (control extreme thoughts) – दररोज अभ्यास करताना अडथळे येत असतात, आत्मविश्वास कमी होत असतो मन भरकटत असते आणि ऐषआराम, व्यसन, टाईमपास करु वाटतो अभ्यासात लक्ष लागत नाही पण मित्रांनो  1 सेकंदाचाच हा विचार असतो त्यावर विजय मिळवायचाय मग दुसर्‍याच सेकंदाला या विचाराला वेसन घाला, आणि तिसर्‍या सेंकदालाच त्यावर नियंत्रण मिळवा, स्वतः ला प्रश्न विचारा याचसाठी का केला होता अट्टाहास….? आणि करत असलेला अभ्यास नियमित राहुद्या.  टेबल, फिल्ड, हातचे काम सोडु नका त्यात पुन्हा मन लावा, त्या कामाला चिकटुन रहा घट्ट, पुढचे 3 तास त्या अभ्यासात गेलेले तुम्हाला कळणार नाहीत.
– stay calm, composed and relaxed all time! – It’s a pretty long journey 
नियतीला मी वचन दिलय, अजुन बराच प्रवास बाकी आहे 
#बाकी_ मध्येच MPSC 2019 पुर्व कडे वळलेल्या वाटसुरूंनी UPSC 2019 पुर्व बाबतची स्पष्टता आताच करून ठेवा.
धन्यवाद 

Nitin Barhate UPSC MPSC

नितिन ब-हाटे
9867637685
(लेखक’लोकनीति IAS, मुंबई’ चे मुख्य समन्वयक असुन स्पर्धापरिक्षा मार्गदर्शक आहेत)

तुम्ही MPSC चा अभ्यास करत असाल तर खालील लेख वाचायला अजिबात विसरू नका.

खुशखबर! MPSC च्या पदसंख्येत वाढ

राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहीरात आली…! आता काय…?

“UPSC/MPSC देत असाल तर पुढील २० गोष्टी लक्षात ठेवा……”

MPSC ची जाहीरात प्रसिद्ध, मराठा समाजासाठी राखीव जागा

“2019 MPSC पुर्व परिक्षेतील CSAT ची तयारी कशी करावी ….??”

इतर महत्वाचे –

भाग १ – स्पर्धापरिक्षेची तोंड ओळख

भाग २ – UPSC, MPSC परीक्षांचा अभ्यास कधी सुरू करावा

भाग 3 – स्पर्धा परिक्षां‌च्या अभ्यासाचा आवाका, त्रिसुत्री आणि रणनीतीची चौकट

भाग ४ – तर मग UPSC /MPSC करू नका ???

भाग ५ – UPSC/MPSC का करावी ???

भाग ६ – महापरिक्षेचे महाभारत, स्पर्धापरिक्षा विद्यार्थी हैराण

भाग ७ – मागच्या वर्षी प्रिलिम्स निघाली होती..यावर्षी ती पण नाही ?? मग हे वाचाच

भाग ८ – निबंधाचे तत्वज्ञान UPSC 2018

भाग 9 – कनेक्टिंग द डाॅटस् …UPSC Mains 2018

“मी कोणत्या सरकारी परिक्षेची तयारी करु…?” UPSC/MPSC ?