Facebook वरील पोस्ट एडिट, डिलीट किंवा रिस्टोअर कशी करावी ??? अशा प्रकारे समजून घ्या

Facebook
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Facebook : जगात सर्वात जास्त आवडल्या जाणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये फेसबुक अग्रेसर आहे. आपले कुटुंब आणि मित्रांशी कनेक्ट राहण्यासाठी लोकांकडून याचा जास्त वापर केला जातो. फेसबुक फोटोस आणि पोस्टद्वारे एकमेकांची खुशाली कळवली जाते. मात्र अनेकदा आपल्याकडून फेसबुक पोस्ट करताना चुकीचे कॅप्शन किंवा फोटो टाकले जातात. ज्यामुळे फेसबुककडून आपली पोस्ट किंवा खात्यावर कडक कारवाई केली जाऊ शकते. अलीकडेच फेसबुककडून अशा 25 लाख पोस्ट्सवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, जर आपल्याला फेसबुकची ही कारवाई अगदी सहजपणे टाळता येऊ शकेल.

Facebook Updates Account Quality In the Midst of It's Own Failures

Meta च्या मालकी असलेल्या या प्लॅटफॉर्मद्वारे युझर्सना आपल्या पोस्ट एडिट आणि डिलीट करण्याची परवानगी मिळते. इतकेच नाही तर युझर कडून एखादी पोस्ट चुकून डिलीट झाली तर ती अगदी सहजतेने रिस्टोअर देखील करता येते. चला तर मग आज आपण Facebook वरील आपली पोस्ट एडिट, डिलीट किंवा रिस्टोअर कशी करता येईल हे जाणून घेऊ …

Facebook: How to Restore a Post You've Deleted

Facebook वरील आपली पोस्ट अशा प्रकारे रिस्टोअर करा

जर आपल्याला फेसबुकवरील आपली पोस्टरिकव्हर करायची असेल तर त्यासाठी Trash सेक्शन मध्ये जा. यासाठी फेसबुक फीडच्या वरच्या उजव्या बाजूला दिलेल्या पर्सनल आयकॉनवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर Settings and Privacy मध्ये जा. इथे Activity log वर क्लिक करा. त्यानंतर डाव्या बाजूला येणाऱ्या कॉलमवर जा आणि खाली स्क्रोल करा. इथे Trash हा पर्याय निवडा. त्यानंतर जी पोस्ट रिस्टोअर करायची असेल ती शोधा. यानंतर, पोस्टच्या समोरील चेकबॉक्सवर टिक करा आणि नंतर Restore वर क्लिक करा.

How to Edit a Post on Facebook

फेसबुकवरील आपली पोस्ट अशा प्रकारे एडिट करा

जर आपल्याला Facebook वरील आपली पोस्ट एडिट करायची असेल तर त्यासाठी सर्वांत आधी आपल्या पोस्टच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन ठिपक्यांवर क्लिक करा. यानंतर एडिट पोस्टच्या पर्यायावर क्लिक करून आपली पोस्ट दुरुस्त करा आणि नंतर सेव्ह करा.

How to Delete a Post on Facebook, or Hide Posts by Others

फेसबुकवरील आपली पोस्ट अशा प्रकारे डिलीट करा

आपल्याकडून Facebook वर जर एखादी चुकीची पोस्ट शेअर झाली असेल आणि आपल्याला ती डिलीट करायची असेल, तर त्यासाठी पोस्टच्या तळाशी असलेल्या Move to Trash या पर्यायावर क्लिक करा. यानंतर Move वर क्लिक करा. इथे हे लक्षात घ्या की, ही पोस्ट डिलीट करण्यापूर्वी ती Trash या सेक्शन मध्ये पाठवावी लागेल. आता इथली पोस्ट 30 दिवसांनंतर आपोआप डिलीट केली जाईल.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.facebook.com/facebook/

हे पण वाचा :

चोरी करून स्विच ऑफ केलेल्या फोनचे ‘या’ App द्वारे कळेल लोकेशन

5 सप्टेंबरपर्यंत मिळणार PM Kisan योजनेच्या 12 व्या हप्त्याचे पैसे, अशा प्रकारे तपासा स्टेट्स !!!

ICICI Bank कडून MCLR च्या दरात वाढ, आता बँकेचे कर्ज महागणार !!!

ATM मधून पैसे काढण्यासाठी बँकांचे काय नियम आहेत ते समजून घ्या !!!

गेल्या 5 वर्षात Best Agrolife च्या शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला 6,900 टक्के रिटर्न !!!