हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । EPF : EPFO सदस्यांना आपल्या कुटुंबीयांसाठी वेलफेयर बेनिफिट देखील दिले जाते. मात्र यासाठी त्यांना ई-नॉमिनेशन दाखल करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला तर भविष्य निर्वाह निधी, पेन्शन (EPS), इन्शुरन्स (EDLI) बेनिफिट्सच्या बाबतीत ऑनलाइन क्लेम निकाली काढण्यासाठी ई-नॉमिनेशन करणे गरजेचे आहे.
आजच्या डिजिटल जगात ई-नॉमिनेशनची प्रक्रिया खूप सोपी झाली आहे. आता EPFO सदस्यांना घरबसल्या ऑनलाइन नॉमिनेशन दाखल करता येईल. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने कडून सदस्यांसाठी ई-नॉमिनेशनची सुविधा दिली जाते.यासाठी, सदस्याला प्रत्येक नॉमिनीसाठी KYC डिटेल्स द्यावे लागतील. मात्र इथे हे लक्षात घ्या कि , ज्यांचे UAN ऍक्टिव्ह आहे त्याच सदस्यांना ई-नॉमिनेशनची सुविधा घेता येईल. तसेच, यासाठी आपला मोबाईल क्रमांक आधारशी लिंक असणे देखील आवश्यक असेल. एका रिपोर्ट नुसार, कर्मचारी पेन्शन योजनेसाठी EPF नॉमिनी देखील व्हॅलिड आहे.
अशा प्रकारे असेल प्रक्रिया
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या वेबसाइटवर जा आणि सर्व्हिसेस सेक्शनमध्ये फॉर इंप्लॉइज’ वर क्लिक करा.
आता सदस्य UAN/ऑनलाइन सर्व्हिसेस वर क्लिक करा.
यानंतर आता UAN आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
मॅनेज करा टॅबमध्ये ई-नॉमिनेशन निवडा.
आता स्क्रीनवर Provide Details टॅब दिसेल. तुम्ही save वर क्लिक करा.
फॅमिली डिक्लेरेशन अपडेट करण्यासाठी Yes वर क्लिक करा.
आता Add Family Details वर क्लिक करा. तुम्ही एकापेक्षा जास्त नॉमिनी जोडू शकता.
कोणत्या नॉमिनीच्या शेअरमध्ये कोणती रक्कम येईल, नॉमिनेशन डिटेल्स वर क्लिक करा. शेअर निश्चित केल्यानंतर, save EPF नॉमिनेशनवर क्लिक करा.
OTP जनरेट करण्यासाठी ई-साइन वर क्लिक करा. आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल.
दिलेल्या जागेत ओटीपी टाकून सबमिट करा.
ई-नॉमिनेशन EPFOकडे नोंदवले जाईल. ई-नॉमिनेशननंतर नियोक्ता किंवा माजी नियोक्त्याला कोणतेही डॉक्युमेंट्स पाठविण्याची गरज नाही.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://epfindia.gov.in/
हे पण वाचा :
SBI YONO App : आता ग्राहकांना डिजिटल माध्यमाद्वारे मिळणार लोन !!! नवीन सुविधेविषयी जाणून घ्या
Investment : वाढत्या महागाईमध्ये मुलांच्या भविष्यासाठी अशाप्रकारे करा गुंतवणूक !!!
PM Kisan मध्ये आता ‘या’ कागदपत्राशिवाय नाही करता येणार रजिस्ट्रेशन !!!
PAN Card शी संबंधित ‘हा’ नवा नियम आजपासून लागू !!! त्याविषयी जाणून घ्या
Sim Card Rule : आता ‘या’ लोकांना सिमकार्ड मिळवण्यात येईल अडचण, जाणून घ्या सरकारचा नवा नियम