बीड : हॅलो महाराष्ट्र – परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे काही शेतकरी आत्महत्येसारखा (suicide) टोकाचा निर्णय घेत आहेत. बीडमध्ये अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. बहिणीच्या लग्नाचे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून 20 वर्षाच्या तरूण शेतकऱ्याने आत्महत्या (suicide) केली आहे. मागील तीन वर्षांपासून सतत शेती न पिकल्याने या शेतकऱ्याने घरातील पत्र्याच्या आडूला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केली.
दीपक बालासाहेब मुंडे असे आत्महत्या (suicide) करणाऱ्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. तो बीडच्या केज तालुक्यातील देवगाव येथील रहिवाशी होता. शेती न पिकल्याने वडिलांच्या नावे असलेले बँकेचे कर्ज व बहिणीच्या लग्नाचे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. या आत्महत्येप्रकरणी (suicide) केज पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
एकाच दिवशी 2 शेतकऱ्यांची आत्महत्या
दरम्यान, बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. रविवारी एकाच दिवशी गेवराई तालुक्यात 2 शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या (suicide) करत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. अमोल रानमारे आणि अर्जुन धोत्रे अशी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे आहेत. या दोन्ही शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले त्यामुळे त्यांनी हि आत्महत्या केली.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय