हृतिक रोशनच्या ‘क्रिश 4’ च शुटिंग लवकरच होणार सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । बॉलिवूड चित्रपट अभिनेता हृतिक रोशनने आपल्या चाहत्यांना एक चांगली बातमी दिली आहे.  हृतिक रोशनने आपल्या ‘क्रिश 4’ चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. ‘क्रिश 3’ च्या प्रचंड यशानंतर आणि चित्रपटात नेत्रदीपक स्टंट करून लोकांची मने जिंकणार्‍या हृतिक रोशनने सुपरहिरो फ्रॅंचायझी ‘क्रिश’ चा चौथा हप्ता बनवण्याची तयारी सुरू केली आहे.

या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन हृतिक चे वडील राकेश रोशन यांनी केले असून ते क्रिश 4 अधिक शक्तिशाली आणि उत्कृष्ट बनवण्याची तयारी करत आहे. लॉकडाऊनच्या वेळी चित्रपटाची स्क्रिप्ट तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

यावर्षी हृतिकच्या  वाढदिवसानंतर हृतिक रोशनच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल, अशी बातमी क्रिश 4 या चित्रपटाविषयी होती. परंतु कोरोनामुळे या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले नाही. चित्रपटाची स्क्रिप्ट तयार करण्यात आली आहे. फ्रँचायझीचा शेवटचा चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता, त्यात कंगना रनौत, विवेक ओबेरॉय आणि प्रियांका चोप्रा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

Leave a Comment