हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । HSBC Bank : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत 5 वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता खासगी क्षेत्रातील HSBC Bank ने देखील 2 कोटी रुपयांपेक्षा कमी फिक्स्ड डिपॉझिट्ससाठी व्याजदरात वाढ केली आहे.
19 डिसेंबर 2022 पासून पासून नवीन दर लागू
HSBC Bank च्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, हे नवीन दर 19 डिसेंबर पासून 2022 पासून लागू आहेत. आता बँकेकडून सामान्य गुंतवणूकदारांना 7 दिवस ते 60 महिन्यांच्या कालावधीसाठी FD वर 2.85% ते 6.00% व्याज मिळेल. त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांसाठी ते 3.35% ते 6.50% पर्यंत किंचित जास्त असेल. याशिवाय, बँकेने 36 महिने ते 37 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर सामान्य नागरिकांना 7% तर ज्येष्ठ नागरिकांना 7.50% दराने व्याज देण्याची घोषणा केली आहे.
वेगवेगळ्या कालावधीसाठीचे व्याजदर
आता HSBC Bank कडून 7 ते 8 दिवसांच्या FD वर 2.85% व्याज मिळेल.
9 ते 29 दिवसांच्या FD वर 3%, 30 ते 59 दिवसांच्या FD वर 3.40% व्याजदर मिळेल.
60 ते 89 दिवसांच्या FD वर 3.60% व्याजदर, 90 ते 94 दिवसांच्या FD वर 3.80% व्याज मिळेल.
95 ते 179 दिवसांच्या FD वर 4 टक्के, 180 दिवसांच्या FD वर 4.50 टक्के व्याजदर मिळेल.
181 ते 269 दिवसांच्या FD वर 3.25% व्याज, 270 ते 399 दिवसांच्या FD वर 3.10% व्याज दर दिला जाईल.
400 दिवसांच्या FD वर 3.25%, 401 दिवस ते 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.25% व्याजदर मिळेल.
18 महिने ते 599 दिवसांच्या FD वर 3.30%, 700 दिवसांच्या FD वर 3.75% दराने व्याज दिले जाईल.
अनेक बँकांनी FD चे दर वाढवले आहेत
अलीकडेच इंडियन ओव्हरसीज बँक, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, येस बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
RBI कडून रेपो दरात वाढ
अलीकडेच, RBI ने डिसेंबरच्या धोरणात रेपो दरात आणखी 0.35 टक्क्यांनी वाढ आहे. या दरवाढीनंतर, रेपो दर आता 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. HSBC Bank
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.hsbc.co.in/accounts/products/fixed-deposits/
हे पण वाचा :
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू Lionel Messi ची एकूण संपत्ती किती ??? त्याविषयीची माहिती जाणून घ्या
FD Rates : ‘या’ बँकेच्या FD वर मिळेल 8.80% पर्यंत व्याज, इतर बँकांचे व्याजदर तपासा
Gold Price : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती
Recharge Plan : फक्त 225 रुपयांमध्ये ‘ही’ कंपनी देत आहे अनलिमिटेड व्हॅलिडिटी
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना मिळणार नवीन वर्षाची भेट, खात्यामध्ये पाठवले जाणार इतके रुपये