10वी- 12वी चा निकाल ‘या’ तारखेपर्यंत जाहीर होणार; बोर्डाची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील 10 वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. 12 वी आणि 12वी चा निकाल कधी लागणार हे आता बोर्डाने स्पष्ट केलं आहे. दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत तर बारावीचा निकाल 10 जूनला लागणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाकडून आज देण्यात आली आहे.

दहावी आणि बारावीच्या पेपर तपासणीचं काम जवळपास पूर्ण झालं असून परीक्षेचा निकाल तयार करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे 10 जूनपर्यंत इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करणार असून दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत आणि 10 जूनला जाहीर केला जाईळ, अशी माहिती शिक्षण मंडळानं दिली आहे.

खरं तर दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचे निकाल (Results) जाहीर केला जात असतो. यावर्षी दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा सुरू होताच राज्यामधील शिक्षक आणि संस्थाचालक संघटनांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता.

यंदा दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172  विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी आणि 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थिनींनी परीक्षा दिली होती. तर 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. यात 6 लाख 22 हजार 994 विद्यार्थी हे विज्ञान शाखेचे तर 4 लाख 37 हजार 336 कला शाखेचे होते. वाणिज्य शाखेतील 3 लाख 64 हजार 262 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती

Leave a Comment