महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट!! एका दिवसांत सापडले तब्बल 40 हजार रुग्ण

corona
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाने कहर केला असून कोरोनाची वाढती रुग्णसंख्या सध्या चिंतेची बाब आहे. ठिकठिकाणी अनेक निर्बंध लादून देखील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख काही कमी होताना दिसत नाही. राज्य सरकारने घेतलेल्या नियमानुसार रविवारपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर अनेक जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे

आज दिवसभरात राज्यात तब्बल 40 हजार 414 नव्या कोरोनारुग्णांची भर पडली आहे. दिवसभरात 17 हजार 874 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 108 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

राज्यात कोरोनाचं थैमान सुरुच आहे. कोरोनाचा संसर्ग आता हाताबाहेर जातांना दिसत आहे. लोकांकडून नियमांचं पालन होत नाहीये. वारंवार आवाहन करुन इशारा देऊनही लोकांमध्ये कुठलही गांभीर्य आलेलं दिसत नाहीये. राज्यात आज वाढलेला आकडा हा फक्त प्रशासनासाठीच नाही तर राज्यातील प्रत्येक नागरिकांसाठी धोक्याची घंटा आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group