अमरावती : हॅलो महाराष्ट्र – पती पत्नी म्हंटले कि वाद हा आलाच. पती आणि पत्नी यांच्यात झालेल्या या वादानंतर त्यांच्यात काहीकाळ अबोला निर्माण होतो पण काही वेळाने राग शांत झाला कि पुन्हा सगळे पाहिल्याप्रमाणे होते. मात्र अमरावती जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका पतीने शुल्लक कारणावरुन रागाच्या भरात चक्क आपल्या पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
पत्नी गंभीर जखमी
हि घटना मेळघाटातील धारणी तालुक्यातील बैरागड या ठिकाणी घडली आहे. यामध्ये पती- पत्नींमध्ये झालेल्या शुल्लक कारणावरून पतीने पत्नीला डिझेल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत महिला 83 टक्के भाजली आहे. पीडित महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
आरोपी पतीला अटक
या प्रकरणात पीडित महिलेच्या पतीवर पत्नीला जिवंत जाळण्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच धारणी पोलिसांनी पीडित महिलेचा पती नासिर याला अटक केली आहे. धारणी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
काय आहे नेमके कारण ?
हाती आलेल्या माहितीनुसार आरोपी पती नासिर शेख गफूर आणि त्याची पत्नी यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. हा वाद एवढा विकोपाला गेला कि पतीने रागाच्या भरात चक्क पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे.