सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
भांडण करून माहेरी गेलेल्या पत्नीस नांदन्यास येत नाहीस तर घटस्फोट दे असे सासरवाडीत जाऊन म्हणणाऱ्या जावयास पत्नीच्या नातेवाईकांकडून काठीने मारहाण करून जखमी करण्यात आले आहे. या प्रकरणी निखिल आप्पासाहेब कांबळे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या पत्नीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विशाल कांबळे, रामदास कांबळे, पत्नी दिपाली कांबळे आणि माणिक कांबळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
निखिल कांबळे यांचा काही वर्षांपूर्वी दीपाली कांबळे हीच्याशी विवाह झाला होता. वारंवार या पती पत्नी मध्ये वादविवाद होत असल्याने पत्नी दीपाली नोव्हेंबर 2019 मध्ये आपल्या माहेरी निघून गेली होती. अनेक वेळा पत्नी दीपालीला घरी परत नेण्याचा निखिल याने प्रयत्न केला, मात्र ती पुन्हा नांदायला अली नाही. बुधवारी दुपारी तीन वाजता सदाशिव पेट्रोल पंपावर निखिल मोटरसायकल मध्ये पेट्रोल भरण्यासाठी गेला असता, पत्नी दीपाली पेट्रोल साठी पंपावर अली होती. निखिलने पत्नीस मला तुझ्या बरोबर बोलायचे आहे. असे म्हंटले असता पत्नी बिनबोलता घरी निघून गेली. निखिल तिच्या पाठीमागे पत्नीच्या घरासमोर गेला. घरासमोर उभा राहून निखिल याने पत्नीस हाक दिली तो म्हणला, एकतर नांदन्यास येत नाहीस तर घटस्फोट दे असे म्हणल्यावर पत्नी दीपाली हिने निखिल यास शिवीगाळ केली. तर विशाल कांबळे आणि रामदास कांबळे या दोघानी काठीने निखिल यास बेदम मारहाण करून जखमी केले. असे निखिल कांबळे याने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे.
संजयनगर पोलीस ठाण्यात मारहाण करणारे नातेवाईक विशाल कांबळे, रामदास कांबळे, माणिक कांबळे आणि पत्नी दीपाली कांबळे या चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पती-पत्नीच्या भांडणात सासुरवाडीतील नातेवाईकांनी केलेला हस्तक्षेप भारी पडला असून या घटनेची पोलीस अधिक तपास करीत आहे.
”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”