हैदराबाद : वृत्तसंस्था – हैदराबादमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. यामध्ये जिभेचे चोचले न पुरवणाऱ्या बायकोविरोधात नवऱ्याने थेट पोलिसात धाव घेतली आहे. बायको आपला आवडीचा मटण रस्सा रात्रीच्या जेवणात बनवत नसल्याने नवऱ्याला राग आला. त्यानंतर त्याने तेलंगणातील नालगोंडा पोलिसांच्या 100 नंबर पोलीस हेल्पलाईनवर वारंवार कॉल केले. त्यामुळे पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. शुक्रवारी रात्री हि विचित्र घटना घटना घडली आहे. पत्नीने मटण करी तयार केली नाही, म्हणून पती नवीनला राग आला होता.
काय आहे नेमके प्रकरण ?
बायको आपला आवडीचा मटण रस्सा जेवणात बनवत नसल्याने नवऱ्याने चिडून पोलिसात तक्रार दाखल केली. सुरुवातीला जेव्हा नवीनने पोलिस नियंत्रण कक्षाचा नंबर डायल केला आणि नेमकं काय घडलं, ते सांगत पत्नीविरुद्ध ‘तक्रार’ केली, तेव्हा त्याने दारुच्या नशेत कॉल केल्याचा समज ऑपरेटरने केला.
सहा वेळा कॉल
यानंतर नवीनने एक दोन नव्हे तर सलग सहा वेळा कॉल केल्यानंतर ऑन ड्युटी पोलिसांनी आपल्या वरिष्ठांना याविषयी माहिती दिली. यानंतर वरिष्ठांच्या पोलिसांची गस्तीवर असलेली गाडी नवीनच्या घरी पाठवण्यात आली पण तो मद्यधुंद अवस्थेत पोलीस त्याला तसेच सोडून परतले.
दुसऱ्या दिवशी पोलिसांकडून अटक
यानंतर पोलिसांनी दुसऱ्या दिवशी आरोपी पती नवीनला अटक केली. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 290 आणि 510 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.