पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या, घटनेस प्रवृत्त करणाऱ्या प्रियकरास चार वर्षांची सक्तमजुरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे 

पत्नीचे विवाहबाह्य असणार्‍या अनैतिक संबंधातून बदनामी झाल्याच्या नैराश्यातून पत्नीचा गळा चिरून खून करत पतीने स्वतः आत्महत्या केल्याची घटना तासगाव तालुक्यातील चिंचणी येथे 27 जानेवारी 2013 रोजी घडली होती. या कृत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी महिलेच्या प्रियकरास न्यायालयाने आज दोषी धरून चार वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. पोपट बबन जाधव असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. पोतदार यांनी आरोपीस भारतीय दंड संहिता कलम 306 अन्वये दोषी धरुन चार वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

मयत पोपट मधुकर जाधव याचे लग्न निलम या महिलेशी झालेले होते. तिचा मावसभाऊ आरोपी पोपट बबन जाधव हा निलमच्या सासरवाडीच्या घरामध्ये कोणीही नसताना लपून छपून, निलमला भेटण्यासाठी येत-जात होता. निलम व आरोपी पोपट बबन जाधव यांचे अनैतिक विवाहबाह्य संबंध होते. हे निलमच्या पतीस समजल्यामुळे तो त्या दोघांना रंगेहाथ पकडण्याकरीता पाळतीवर राहू लागला. एके दिवशी पत्नी व आरोपी हे एका खोलीत पोपट याला रंगेहाथ सापडले. परंतु आरोपी पोपट जाधव चकमा देवून पळून गेला.

हा प्रकार वारंवार होऊ लागल्यामुळे गल्लीतील व परिसरातील लोकांना, नोकरीच्या ठिकाणी, नातेवाईक यांच्यामध्ये मयत पोपट जाधव यांची बदनामी होवून त्याचा अपमान होवू लागला. सदरच्या त्रासाला कंटाळून दिनांक 27 जानेवारी 2013 रोजी मयत पोपट मधुकर जाधव याने सदर गैरकृत्यास कंटाळून पत्नीचा गळा कापून खून केला व त्याचवेळी छताच्या अँगलला दोरीने फास घेऊन स्वतः आत्महत्या केली होती.

 

Leave a Comment