महिन्याभरापासून पती घेत आहे गायब पत्नीचा शोध

औरंगाबाद – आजकाल घरगुती वादातून पत्नीने घर सोडून गेल्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. अशीच एक घटना औरंगाबादच्या हर्सूल भागात उघडकीस आली आहे. एका मसाला विक्री करणाऱ्याची पत्नी घर सोडून निघून गेली असून याप्रकरणी पतीने बेगमपुरा पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, शहरातील जटवाडा रोड परिसरातील शहीदा कॉलनीमध्ये राहणाऱ्या शेख एजाज शेख मुस्ताख हे आपला मसाला विक्रीचा व्यवसाय करतात. नित्याप्रमाणे ते 6 सप्टेंबर रोजी मसाला विक्री करण्यासाठी गेले. त्यानंतर त्यांचे आई वडील देखील भाजीपाला घेण्यासाठिव बाहेर गेले. यादरम्यान त्यांची पत्नी अंजुम बेगम शेख एजाज कोणालाही न सांगता निघून गेली. त्यानंतर घरच्यांनी तिचा आसपासच्या परिसरात शोध घेतला असता ती कुठेही आढळून अली नाही. शेवटी पटीने यासंदर्भात पत्नीची मिसिंग रिपोर्ट बेगमपुरा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

परंतु आता या घटनेला जवळपास एक महिना उलटून देखील पत्नीचा अजूनही काही शोध लागलेला नाही. तरी पत्नी अंजुम बेगम शेख एजाज रंग – काळासावळा, केस काळे, अंगात पंजाबी रंगाचा ड्रेस व बुरखा, उंची 5×2 अशा वर्णनाची महिला कुठे आढळून आल्यास बेगमपुरा पोलिसांत संपर्क करावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यातून आले आहे.

You might also like