जालना : हॅलो महाराष्ट्र- जालना जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका आरोपी नराधम पतीने आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या (killed) केली आहे. जालना जिल्ह्यातल्या कुंभारी शिवारात ही धक्कादायक घटना घडली आहे. कविता गजानन आव्हाड असे या मृत (killed) महिलेचे नाव आहे. तर गजानन रघुनाथ आढाव असे आरोपी नराधम पतीचे नाव आहे. याप्रकरणी हसनाबाद पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय घडले नेमके?
मृत महिलेचा वर्षभरापूर्वी आरोपी गजानन रघुनाथ आढाव याच्याशी विवाह झाला होता. मागच्या काही दिवसांपासून दोघांमध्ये सतत भांडणं होत होती. यामुळे पती गजानन विरोधात हर्सुल पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर नातेवाईकांनी दोघांमध्ये मध्यस्थी करून भांडण मिटवत दोघांमध्ये समन्वय घडवून आणला होता. त्यानंतर पती गजानन तिला सासरी घेवून गेला होता.
यानंतर काही दिवसांपूर्वी कविता हिची सासू कौशल्या रघुनाथ आढाव हिच्यासह घरातील मंडळींनी घर विकत घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये घेवून ये, यासाठी तिचा छळ सुरु केला होता. यानंतर पती गजानन याने तिचा खून (killed) केला. त्यानंतर त्याने हा खून वाटू नये म्हणून ट्रॅक्टर अंगावर घालून अपघाताचा बनाव केला. या प्रकरणी मृत (killed) कविता हिच्या भावाच्या फिर्यादीवरून आरोपी गजानन याच्याविरोधात हसनाबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हसनाबाद पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय