मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतील चेंबूरमध्ये पती पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. यामध्ये मुस्लिम रीति रिवाज पाळत नाही, घटस्फोट मागते आणि मुलाचा ताबा देत नाही या रागातून आंतरधर्मीय लग्न केलेल्या पतीने भररस्त्यामध्ये पत्नीची चाकूने वार करून हत्या (Murder) केली आहे. या घटनेमुळे (Murder) परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी आरोपी पती इकबाल महमंद शेख याला अटक केली आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
पहिल्या पत्नीकडून मुल होत नाहीत म्हणून इकबालने रुपाली रमेश चंदनशिवें हिच्याशी तीन वर्षांपूर्वी लग्न केले होते. रुपाली आणि इकबाल यांनी प्रेम विवाह केला होता. मात्र लग्नानंतर आंतरधर्मीय असल्याने रुपालीला मुस्लिम रीति रिवाज जमत नव्हते. यावरुन तिचे आणि इकबालचे रोज भांडण होत होते. यामुळे ते मागच्या सहा महिन्यापासून विभक्त राहत होते.
यानंतर काल रात्री इकबालने रुपालीला भेटण्यासाठी चेंबूरच्या पीएल लोखंडे मार्गवर नागेवाडी या ठिकाणी बोलावले. यानंतर त्यांचे रस्त्यावरच भांडण सुरु झाले. यानंतर आरोपी पती इकबालने रुपालीवर चाकूने वार करत (Murder) घटनास्थवरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच टिळक नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर टिळक नगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी इकबालला अटक केली. रुपाली आणि इकबालला दोन वर्षांचा मुलगा आहे.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!