राजस्थान : वृत्तसंस्था – राजस्थानच्या बुंदीमध्ये आरोपी पतीने रागाच्या भरात पत्नीचा गळा चिरून तिची निर्घृणपणे हत्या (Murder) केली आहे. त्याने आपल्या मुलांसमोर पत्नीचा गळा चिरला (Murder) आणि त्या ठिकाणाहून पळ काढला. घटनेच्या 5 तासांनंतर पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपीला अटक केली आहे. पत्नीच्या बोलण्याचा राग आल्याने त्याने स्वयंपाक बनवत असतानाच पत्नीला मारहाण करून कुऱ्हाडीने तिचा गळा चिरला (Murder) असल्याचे आरोपीने पोलीस चौकशीत सांगितले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.आणि मृतदेह ताब्यात घेऊन वैद्यकीय मंडळाकडून मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
आरोपी हत्या करून घराला कुलूप लावून फरार झाला होता. घटनेची माहिती मिळताच इंद्रगड पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कुलूप तोडले तेव्हा मृत महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. यानंतर घटनास्थळाची पाहणी करून एफएसएल वैद्यकीय पथकाला पाचारण करून मृतदेह (Murder)इंदरगढ रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला व शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला.
मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपीला अटक
या घटनेनंतर इंद्रगडचे एसएचओ हरीश भारती यांच्या नेतृत्वाखाली विविध पथके आरोपींच्या अटकेसाठी रवाना झाली. एफएसएल टीम आणि एमओबी टीमने घटनास्थळी वैज्ञानिक संशोधनासाठी पुरावे गोळा केले. गठित पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि माहिती देणारी यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणा सक्रिय करून आरोपींच्या लपण्याच्या ठिकाणांचा शोध घेत अवघ्या 5 तासांत आरोपी गीताराम याला मंदिर गुढा येथून अटक करण्यात आली.
हे पण वाचा :
‘या’ 8 मार्गांनी Social Media वर स्वतःला ठेवा सुरक्षित !!!
ICC Test Ranking : जो रूटने टेस्ट क्रिकेटमध्ये कोहली, स्मिथ, बाबरला मागे टाकून पटकावले पहिले स्थान
रामराज्य आणण्यासाठी रामलल्लाचं दर्शन, जनतेला दिलेले वचन पाळलं हेच आमचं हिदुत्व : आदित्य ठाकरे
साताऱ्याजवळ राहत्या घरात विषारी सापासह 20 पिल्लं सापडली
बरडच्या महिला सरपंचासह कुटुंबातील 5 जणांना पोलिस कोठडी