कट मारून जाणे बेतले जीवावर, ट्रकखाली चिरडून बाइकस्वाराचा मृत्यू

Hydrabad
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हैदराबाद : वृत्तसंस्था – आंध्र प्रदेशातील हैदराबाद (hyderabad) शहरात एक धक्कादायक अपघात घडला आहे. यामध्ये एका बाइकस्वाराला ट्रकला कट मारून जाणे जीवावर बेतले आहे. डाव्या बाजूने कट मारुन पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना ट्रकने बाईकला धडक दिली. त्यानंतर ट्रकखाली चिरडून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. आज सकाळी सव्वाआठच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. हि घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सायबराबाद पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

काय घडले नेमके ?
आंध्र प्रदेशातील हैदराबाद (hyderabad) शहरात दुंडीगल भागात ट्रक आणि बाईकचा अपघातात होऊन बाईकस्वाराला आपला जीव गमवावा लागला आहे. ट्रकला डाव्या बाजूने कट मारून जाणे बाइकस्वाराला चांगलेच महागात पडले आहे. या अपघातात ट्रकची धडक लागून बाईकस्वार तरुण जागीच ठार झाला आहे. सोमवारी सकाळी भर रस्त्यात रहदारीच्या वेळी सव्वा आठ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघाताचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. सायबराबाद पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

बाईकस्वाराचा दोष?
या अपघातात संपूर्ण बाइकस्वाराचा दोष आहे. त्याने चुकीच्या बाजूने कट मारल्यामुळे हा दुर्दैवी अपघात घडला आहे. तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यात ट्रक आणि ट्रॉलीची समोरासमोर धडक होऊन असाच एक भीषण अपघात घडला होता. या अपघातात 8 जण ठार झाले असून 17 जण जखमी झाले आहेत.

हे पण वाचा :
काही लोक पावसाळ्यातील छत्र्यांसारखे कधीतरी उगवतात आणि… ; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

PPF खात्यात गुंतवणूक करा अन् करोडपती व्हा; कसे ते जाणून घ्या

अरे अरे.. सेल्फीची हि कुठली पद्धत? अक्षय कुमारचे केस ओढून चाहत्याने केला कहर

‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे’च्या ट्रेलर लॉंचसाठी ठाकरे आणि खान एकाच मंचावर

राज्य कसं चालवायचं ते फडणवीसांकडून शिका; नवनीत राणांचा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर निशाणा