राज्य कसं चालवायचं ते फडणवीसांकडून शिका; नवनीत राणांचा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावती खासदार नवनीत राणा यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर निशाणा साधला. राज्य कस राज्य कसं चालवायचं ते फडणवीसांकडून शिका अस म्हणत उद्धव ठाकरेंनी आम्हाला तत्व शिकवण्याची गरज नाही अशी टीका नवनीत राणा यांनी केली. राज्य सरकार कडून वाईट वागणूक मिळाली असून त्यादृष्टीने तक्रार दाखल करण्यासाठी नवनीत राणा दिल्लीला निघाल्या. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंवर टीका केली.

नवनीत राणा म्हणाल्या, उद्धव ठाकरे सूडबुद्धीने राजकारण करतात. देवेंद्र फडणवीस यांनीही पाच वर्षे हे राज्य चालवल आहे. पण अशाप्रकारे सुडाचं राजकारण त्यांनी कधी महाराष्ट्रात केलं नाही. कोणत्या भावनेनं राज्यकारभार करायला हवा, राज्य कसं चालवायचं हे उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिकावं, असं राणा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, यापूर्वीच नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान देत म्हंटल होत की, उद्धव ठाकरे यांच्यात जर दम असेल तर महाराष्ट्रातील कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवावी. मी त्यांच्या विरोधात लढेन. नारी शक्ती काय असते हे मी त्यांना दाखवून देईन अस नवनीत राणा म्हणाल्या होत्या.