माझ्याकडेही गुवाहाटीला जाण्याचा पर्याय होता, पण…; राऊतांचं मोठं विधान

Sanjay Raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माझ्याकडेही गुवाहाटीला जाण्याचा पर्याय होता, पण मी फुटणारा बुडबुडा नाही, जे बुडबुडे होते ते फुटले अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्यसभा निवडणुकीत मलाही पाडण्याचा प्रयत्न झाला. मी जरी हरलो असतो तरी शिवसेना सोडून गेलो नसतो. माझ्याकडेही गुवाहाटीला जाण्याचा पर्याय होता, पण मी बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आहे. मी फुटणारा बुडबुडा नाही, जे बुडबुडे होते ते फुटले असा टोला राऊतांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.

तसेच तुम्ही वेगळी चूल मांडली तरी मूळ शिवसेना ठाकरेंपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. ठाकरे जिथे उभा आहेत तीच खरी शिवसेना आहे. ठाकरे आणि शिवसेना या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. काँग्रेस पण खूप वेळा फुटली, पण मूळ काँग्रेस ही इंदिरा गांधी यांचीच राहिली याचा दाखला संजय राऊत यांनी दिला.