हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। उत्तरप्रदेश मधील कानपुर येथे नुकतीच एका गुन्हेगाराला पकडायला गेलेल्या पोलिसांच्यावर गोळीबार झाला होता. यामध्ये ८ पोलीस शहीद झाले आहेत. या चकमकीत सीओ देवेंद्र मिश्रा शहीद झाले आहेत. एका वृत्तवाहिनीवर त्यांची मुलगी वैष्णवी हिने आपल्यालाही वडिलांसारखे पोलिसात जायचे आहे असे सांगितले आहे. या घटनेने आपल्याला खूप वाईट वाटले असून आता माझाही वडिलांसारखे पोलिसात जाऊन अशा लोकांना शासन करणे हा हेतू असल्याचे तिने सांगितले आहे.
वैष्णवी एका वृत्तवाहिनीशी बोलत होती. तिला पूर्वी डॉक्टर व्हायचे होते, मात्र वडिलांसोबत झालेल्या या घटनेने आपल्याला प्रचंड मानसिक त्रास झाला आहे. आणि आता मलाही त्यांच्यासारखेच अशा गुन्हेगारांना पकडायचे आहे असे तिने सांगितले आहे. मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे असे ती म्हणाली. विकास दुबे हा निष्णात गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे.
विकास दुबे हा हिस्ट्रीशीटर म्हणून ओळखला जातो. तो पोलीस कोठडीत असतानाही सूत्र हलवत असल्याचे हळूहळू समोर येते आहे. त्याला पकडण्यासाठी कानपुर पोलिसांनी छापा टाकला असता झालेल्या गोळीबारात ८ पोलीस शहीद झाले आहेत. यावेळी २ गुन्हेगारही मारले गेले आहेत. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या पोलिसांच्या घरचे सांत्वन केले होते तसेच त्यांच्यासाठी १ करोड रुपयांची रक्कम जाहीर केली होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.