हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास मी घट्ट मिठीत घेऊन स्वागत करेन. कारण, त्यातून मी असा अर्थबोध घेईन की त्यांना त्यांचे नेते चुकीचे होते याची उपरती झाली असेल अशी टीका बंडखोर आमदार महेश शिंदे यांनी केल्यानंतर आता शशिकांत शिंदे यांनीही त्यांना थेट प्रत्युत्तर दिले आहे. आमची निष्ठा पैशाने विकली जात नाही. ज्यांची लोकप्रियता ढासळू लागलीय आणि ज्यांना गद्दार म्हणून हिनवले जात आहे अशांनी माझ्याबद्दल कितीही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांना त्यात यश येणार नाही असा पलटवार त्यांनी केला.
शशिकांत शिंदे यांनी याबाबत ट्विट करत म्हंटल कि, आमची निष्ठा पैशाने विकली जात नाही! आम्ही पवारनिष्ठ! आमची निष्ठा नेत्यांच्या विश्वासावर आणि प्रेमावर टिकून आहे. ज्यांची लोकप्रियता ढासळू लागलीय आणि ज्यांना गद्दार म्हणून हिनवले जात आहे अशांनी माझ्याबद्दल कितीही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांना त्यात यश येणार नाही.
मी आदरणीय पवार साहेबांमुळेच घडलो आहे आणि कायम पवार साहेबांसोबतच राहणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या पक्ष प्रवेशासाठी काही लोकांनी प्रयत्न केला असताना देखील मी कायम शरद पवार साहेबांशी एकनिष्ठ राहिलो आहे, आणि हे सर्वांना ठाऊक आहे. @pawarspeaks @SakalMediaNews
— Shashikant Shinde (@shindespeaks) July 28, 2022
मी आदरणीय पवार साहेबांमुळेच घडलो आहे आणि कायम पवार साहेबांसोबतच राहणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या पक्ष प्रवेशासाठी काही लोकांनी प्रयत्न केला असताना देखील मी कायम शरद पवार साहेबांशी एकनिष्ठ राहिलो आहे, आणि हे सर्वांना ठाऊक आहे. असे म्हणत शशिकांत शिंदे यांनी महेश शिंदे यांनी केलेला दावा खोडून काढला.
महेश शिंदे नेमकं काय म्हणाले-
शशिकांत शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास मी घट्ट मिठीत घेऊन स्वागत करेन. कारण, त्यातून मी असा अर्थबोध घेईन की त्यांना त्यांचे नेते चुकीचे होते याची उपरती झाली असेल. ते आतापर्यंत चुकीच्या नेतृत्वात काम करत होते आणि त्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघातील लोकांना लुटलं, हे सिद्ध होईल, अशी टीका महेश शिंदे यांनी केली होती.