सिंधुदुर्ग प्रतिनिधी । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला मानून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेशी जुळवून घेण्याची तयारी केल्याचे चित्र दिसत आहे. मी नम्रच आहे, शिवसेनेने त्याचा बोध घ्यावा, असे राणे यांनी स्पष्ट केल. असे असले तरी सिंधुदुर्गात लढत मात्र शिवसेना विरुद्ध राणे अशीच होत आहे.
शिवसेना आणि राणे यांच्यातील राजकीय कटुता सर्वश्रुत आहेच; मात्र आता राणे यांनी शिवसेनेशी जुळवून घेण्याचे संकेत दिले आहेत. भाजपने नितेश राणेंना कणकवलीतून उमेदवारी दिल्यानंतर शिवसेनेने त्यांच्या विरोधात सतीश सावंत यांना एबी फॉर्म दिला आहे. ही लढत आता चुरशीची झाली आहे.
याआधीही राणेंनी शिवसेनेने निमंत्रण दिल्यास युती असल्याने उद्धव ठाकरेंच्या सभेला जायची तयारी दाखवली होती. त्यामुळे एकेकाळी आक्रमक भूमिकेसाठी सर्वश्रुत असलेले राणे मात्र आज आपले राजिक्य भवितव्य वाचवण्यासाठी शिवसेनेशी समेट घडवू आणू पाहत आहेत. तेव्हा शिवसेनेच्या राणें विषयीच्या भूमिकेत काही बदल होणार का? या प्रश्नाचे उत्तर येणार काळच देईल.