मी एक तासापेक्षा जास्त वेळ प्रचार करू शकत नाही, ममता दीदींसाठीही नाही; नुसरत जहाँचा व्हिडीओ व्हायरल

Nusrat Jaha
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजपने बंगाल जिंकण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे तर दुसऱ्या बाजूला तृणमूल कॉंग्रेसचे नेते विजय आम्हीच मिळवू असं छातीठोकपणे सांगत आहेत. एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला सध्या सोशल मीडियावर तृणमुलच्या खासदार नुसरत जहाँ यांचा एक व्हीडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. याच गोष्टीचा फायदा घेत भाजप बंगालनं त्यांचा हा व्हिडीओ शेअर करत फिरकी घेतली आहे. ‘नुसरत जहाँ टीएमसी खासदार, मी एका तासापेक्षा जास्त प्रचार करू शकत नाही, इतकं तर मी ममता बॅनर्जींसाठीही करणार नाही,’असं त्यांनी या व्हिडीओसह लिहिलं आहे.

पश्चिम बंगालमधील दुसऱ्या टप्प्याचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. दुसऱ्या टप्प्यात नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. या मतदारसंघातून स्वत: ममता बॅनर्जी निवडणूल लढवत आहेत. पश्चिम बंगालमध्ये 30 जागांवर येत्या 1 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात नंदीग्रामचाही समावेश आहे. तर, 30 मार्च रोजी दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचार संपणार आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी, अमित शहा यांच्यासह शुभेंद्रू अधिकारी यांनी दुसऱ्या टप्प्यासाठी झोकून देऊन प्रचार सुरू केला आहे. कॉंग्रेसची या निवडणुकीत डाव्यांच्या सोबत आघाडी आहे तर एमआयएम देखील या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहे. यामुळे ममता बॅनर्जी यांना भाजपाबरोबरच एमआयएम ,काँग्रेस आणि डाव्यांच्या आघाडीविरोधात लढावे लागणार आहे.

ममता बॅनर्जी यांच्यासाठी पश्चिम बंगालची लढाई कधी नव्हे इतकी अटीतटीची झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचासारखा खंदा नेता आणि भाजपच्या अवाढव्य प्रचारयंत्रणेचा सामना करण्यासाठी ममता बॅनर्जी यांना राष्ट्रीय स्तरावरील मोदीविरोधकांची साथ मिळण्याची गरज आहे. शरद पवार (Sharad Pawar) हे सध्या सुरु असलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये प्रचारसभा घेणार होते. पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये त्यांचे प्रचार दौरे नियोजित होते. मात्र आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ३१ मार्चला पोटाची शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे शरद पवार यांचे आगामी सर्व कार्यक्रम तातडीने रद्द करण्यात आले आहेत.

शरद पवार १ एप्रिलपासून तीन दिवस पश्चिम बंगालमध्ये प्रचार करणार होते. त्यासाठी भाजपला कात्रजचा घाट दाखवणाऱ्या शरद पवार यांच्यासारख्या नेत्याचा ममता बॅनर्जी यांना प्रचारात फायदा होण्याची शक्यता होती. मात्र, आता ऐन लढाईच्यावेळी तृणमूल काँग्रेसला शरद पवारांची रसद मिळणार नसल्याने ममता बॅनर्जी यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.