उशिरा सुचलेलं शहाणपण; कर्मभूमी मुंबईबद्दल मला प्रेम असल्याचे सांगत कंगना म्हणाली ‘जय मुंबई!’

मुंबई । ठाकरे सरकारवर टीका करताना मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्याने कालपासून अभिनेत्री कंगना रणौतवर टीकेचा भडीमार होतं आहे. कला विश्वातील मराठी आणि इतर कलाकार असो वा सामान्य मुंबईकर कंगनाच्या विधानावर संताप व्यक्त करत होते. आपल्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना कंगनाने आता जय मुंबई, जय महाराष्ट्रचा नारा देत सारवासाराव करण्याचा प्रयन्त केला आहे.

“महाराष्ट्रासह सर्वत्र असलेल्या मित्रपरिवाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. त्यांना माझा हेतू माहित आहे. माझी कर्मभूमी असलेल्या मुंबईबद्दल मला प्रेम सिद्ध करण्याची गरज नाही. मुंबईला मी नेहमीच यशोदा मातेचा दर्जा दिला आहे. जय मुंबई, जय महाराष्ट्र असे कंगनाने तिच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर सातत्यानं भाष्य करत असलेल्या अभिनेत्री कंगना रणौतनं मुंबई पोलिसांची सुरक्षा घ्यायला नकार दिला होता. आपल्याला मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटतेय, असं कंगना म्हणाली होती. महाराष्ट्र पोलीस कंगनानं महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या टीकेवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी कंगनाला सुनावलं होतं. तसंच तिला मुंबईत भीती वाटत असेल तर तिनं परत येऊ नये असं ते म्हणाले होते. त्यानंतर आता कंगनानं संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

 

You might also like