हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज गुढीपाडव्यानिम्मित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. हा शिवरायांचा लढवय्या महाराष्ट्र आहे. गनिमी काव्यानं तो करोनाच्या संकटावर मात करणारच. तेव्हा सर्वानी सरकारच्या सूचनांचे पालन करून करोनाच्या संकटावर मात करून विजयाची गुढी उभारा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. आता जरी आपण शांततेत गुढीपाडवा साजरा करत असलो तरी ही शांतता काही दिवसांनी जल्लोषात बदलेल असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला यावेळी दिला.
घरात मी मिसेस मुख्यमंत्र्यांच ऐकतोय तुम्ही तुमच्या मिसेसचं ऐका
या संचारबंदी दरम्यान अनेक दिवसांनी सर्व कुटुंब एकत्र आले आहे. कोरोनामुळे कुटुंबातील लोकं एकत्र आली आहेत ही सकारात्मक बाब आहे. तेव्हा आपल्या कुटुंबियांसोबत घरात वेळ घालावा. घरात मी मिसेस मुख्यमंत्र्यांच ऐकतोय तुम्ही तुमच्या मिसेसचं ऐका अशी असं मिश्किल आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलं. १९७१ चं युद्ध आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कोरोनाचा शत्रू मोठा आहे. तो अदृश्य आहे तो दिसत नाही. घराबाहेर पडलो तर तो कधीही हल्ला करेल. आपण बाहेर पडलो तर तो आपल्या घरात येईल. अनेक जण एकत्र आलेत. आपण आजपर्यंत जे गमावलं होतं ते या निमित्तानं वापरतो असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या संबोधनात म्हटलं.
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बंद होऊ देणार नाही
जीवनावश्यक वस्तूंच्या सेवेवर कुठलाही परिणाम होऊ दिला जाणार नाही. किमान ६ महिने पुरेल इतके अन्नधान्य साठा उपलब्ध आहे. भाजीपाल्याची दुकानंही बंद होणार नाहीत. गर्दी करू नका. कोणत्याही परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, किराणा, भाजीपाला, वैद्यकीय सेवा बंद करणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. जीवनावश्यक काही आणायला जाल तर एकट्यानं जा अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या संबोधनात केल्या.
करोनाच्या संकटात उद्योजक, कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वेतन द्यावं
हातावर पोट असलेल्यांचं किमान वेतन थांबवू नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी उद्योजक, कंपनी व मालकवर्गाला केलं आहे. त्यांच्या पगारात कपात करु नका असं कळकळीचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी उद्योगपतींना केलं. वेतन बंद केल्यास करोनाच्या संकटात आणखी एका संकटाची भर पडून परिस्थिती चिंताजनक मिळेल. म्हणून सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या असं मुख्यमंत्री म्हणाले.
खिडक्या उघडून ‘चला होऊ येऊ द्या’
शक्यतो घरातील एसी बंद करा. बाहेरची हवा घरात येऊ द्या . ‘चला होऊ येऊ द्या’ असं म्हणत खिडक्या उघडा. मात्र, हे गमतीनं म्हणत असलो तरी अजून करोनाची पीडा टाळली असं समजू नका. घरातच राहा, घरातील एसी बंद ठेवा असं केंद्राकडून सांगितलं आहे. आम्ही हे सुरू केलंय असं मुख्यमंत्री म्हणाले.
सकाळी आलो असतो, तर छातीत धस्स झालं असतं
काल रात्री थोडी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. अस्वस्थतात होती. त्यात मी आज सकाळी आलो असतो, तर आता काय सांगणार, छातीत धस्स झालं असतं. त्यामुळे सकाळी आलो नाही. आज मी काही नकारात्मक सांगणार नाहीय. तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ”जनतेला आता संकटाच्या गांभीर्याची कल्पना आली आहे आतापर्यंत आपण नकारात्मक बघत होता. घराबाहर पडू नका हे, मी आधीच सांगितलं आहे. असं मुख्यमंत्री यांनी म्हटलं.
ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.
हे पण वाचा –
गुड न्यूज! महाराष्ट्रातील पहिल्या करोनाग्रस्ताला डिस्चार्ज
एक महिला जिच्यामुळे संपूर्ण देशात पसरला कोरोना व्हायरस
कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलेच्या मुलासही होऊ शकतो संसर्ग ? जाणून घ्या
‘खरंच…कोरोना विषाणू हवेतून पसरत आहे का? पहा काय म्हणतंय WHO…
सावधान : शरीरात ही ३ लक्षणे दिसल्यास समजून घ्या की आपण कोरोना विषाणूने संक्रमित आहात, जाणून घ्या