लढेन तर पणजीतूनच; उत्पल पर्रीकरांनी स्पष्ट केली भूमिका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने 40 पैकी 34 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर यांचा पत्ता कापण्यात आला आहे. उत्पल पर्रीकर यांनी अन्य मतदारसंघातुन निवडणूक लढवावी अस भाजपचे मत आहे. मात्र जर मी निवडणूक लढलो तर पणजीतुन लढेन अशी स्पष्ट भूमिका उत्पल पर्रीकर यांनी मांडली.

गोवा विधानसभेची निवडणूक लढवेन तर फक्त पणजीतूनच लढवणार. डिचोली किंवा अन्य कोणत्याही जागेवरून आपला निवडणूक लढवण्याचा विचार नाही. माझी भूमिका स्पष्ट आहे. यापुढे माझा निर्णय काय असेल, ते लवकरच जाहीर करेन. पण पणजी हाच माझा एकमेव पर्याय आहे, हे नक्की, असे उत्पल पर्रिकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

फडणवीस नेमकं काय म्हणाले-

उत्पल पर्रिकर यांना आम्ही भाजपकडून तिकीट देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांना आम्ही इतर दोन मतदारसंघाचे पर्याय दिले आहेत. त्यापैकी एक पर्याय त्यांनी नाकारला आहे. पण दुसऱ्या पर्यायाबाबत त्यांच्याशी बोलणी सुरू आहे. मला असं वाटतं की दुसऱ्या पर्यायाबद्दल ते सकारात्मक उत्तर देतील अस फडणवीस म्हणाले होते

केजरीवालांची ऑफर-
दरम्यान, भाजपने उत्पल पर्रीकरांचा पत्ता कट केल्यानंतर आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी पर्रीकरांना खुली ऑफर दिली आहे. भाजपचे पर्रिकर परिवाराबाबत ‘यूज एंड थ्रो’ धोरण आहे. मी नेहमी मनोहर पर्रिकर यांचा सन्मान केला. त्यामुळे AAP च्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी उत्पल यांचे स्वागत आहे असे केजरीवाल यांनी म्हंटल.

Leave a Comment