हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मोठ्या प्रमाणात चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्ग मधील चिपी विमानतळावर सकाळी दाखल झाले. त्यानंतर ते थेट “तौक्ते” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीतीळ वायरी निवती बंदराच्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी रवाना झाले आहेत. यावेळी त्यांनी ” मी फोटोसेशनसाठी या ठिकाणी आलो नाही. सिंधुदुर्ग व रत्नागिरीला मोठ्या प्रमाणात वादळाचा तडाखा बसला आहे. या ठिकाणी शेतकऱ्यावर दुहेरी संकट कोसळले आहे. अशा परिस्थिती मी हेलिकॉप्टरमधून नाही तर थेट जमिनीवर जाऊन शेतकऱ्यांशी जाऊन संवाद साधणार आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदींना त्यांनी टोला लगावला.
या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा सिंधुदुर्गा पाठोपाठ रत्नागिरीलाही बसला आहे. या ठिकाणी झालेल्या नुकसानीची आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पाहणी केली जात आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली, तर अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाले आहेत. काही ठिकाणी फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहेत. या ठिकाणी त्यांच्याकडून पाहणी केली जाणार आहे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रथम वायरी येथे पाहणी केल्यानंतर निवती बंदराला भेट दिल्यानंतर त्या ठिकाणच्या बोटींच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी रवाना झाले असून या ठिकाणी पाहणी केल्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आढावा बैठक घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या नियोजित दौऱ्यावेळी ते वायरी, ता.मालवण , निवती, ता.वेंगुर्ला, रत्नागिरी येथे जात आहेत.