काँग्रेस सोडणार का? अशोक चव्हाण यांनी दिले ‘हे’ उत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे वृत्त समोर येताच राजकीय चर्चाना उधाण आलं. अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर आहेत का ? अशाही चर्चा सुरु आहेत. या सर्व घडामोडींवर भाष्य करत अशोक चव्हाण यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. आपण काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिल आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, गणपतीच्या काळात अनेक नेते एकमेकांच्या घरी दर्शनाला जात असतात. राजकीय मतभेद असले तरी वैयक्तिक संबंध तर असतातच ना? असं म्हणत माझ्या काँग्रेस सोडण्याच्या बातम्या खोटया आहेत असं अशोक चव्हाण यांनी म्हंटल. मी कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस सोडणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, मी आता दिल्लीला जात आहे. देशातील वाढत्या महागाई विरोधात काँग्रेसच्या देशव्यापी आंदोलनात सहभागी होणार आहे. याशिवाय राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रातील नियोजन माझ्याकडे आहे, त्याबाबत सगळं नियोजन करायचं आहे असेही अशोक चव्हाण यांनी म्हंटल.

दरम्यान, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चा खोडून काढल्या आहेत. अशोक चव्हाण आमचे ज्येष्ठ नेते असून आम्ही एकत्र काम करत आहोत. ते काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाहीत. ते सध्या भारत जोडो यात्रेच्या नियोजनात सहभागी होत आहेत. गणपती दर्शनाच्या निमित्ताने अशोक चव्हाण मित्राकडे गेले. तिथे दुसऱ्या नेत्यांची भेट झाली. म्हणून त्याचा असा अर्थ लावणं योग्य नाही असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हंटल