पुणे । प्रतिनिधी
मावळमध्ये पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला होता. त्या गोळीबारात ३ शेतकरी ठार झाले होते. या गोळीबाराचे आदेश अजित पवार यांनी दिले होते असा आरोप त्यांच्यावर करण्यात येते. त्या आरोपाचे आज अजित पवार यांनी स्वतः खंडन केले आहे. मावळ गोळीबारात मी दोषी असल्यास मी राजकारण सोडेल असे अजित पवार यांनी म्हणले आहे.
वर्ध्यात भाजपच्या पहिल्या प्रचार सभेत खुद्द नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांच्यावर मावळ गोळीबाराचे आरोप केले होते.त्याच प्रमाणे राष्ट्रवादी सत्तेत असताना मावळचे गोळीबार प्रकरण घडल्यामुळे अजित पवार यांनी या संदर्भात आदेश दिले होते असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात येतो. तसेच अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार मावळ मधून उमेदवारी करत असल्याने हा प्रश्न पुन्हा एकदा प्रकाश झोतात आला आहे. याच मुद्द्याला धरून राज्याचे राजकारण तापायला सुरुवात झाली आहे.
मावळ गोळीबार प्रकरणी जर मी गोळीबाराचे आदेश दिले असेल तर मी माझे राजकारण पणाला लावतो. मावळ गोळीबार प्रकरणी मी जर आदेश दिल्याचे एकही अधिकाऱ्याने सांगितले तर मी राजकारण सोडून राजकारणापासून दूर निघून जातो असे अजित पवार म्हणाले आहेत. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि मी कसा शेतकऱ्यांना मारण्याचा आदेश देईल असे अजित पवार म्हणाले आहेत.