हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यातील काही व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतात. अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओचे काही लोकांनी कौतुक केले आहे. तर काही लोकांनी टीका केली आहे. या व्हिडिओमध्ये शेतीच्या तंत्रज्ञानासाठी (technology) बैल आणि गाईचा वापर करण्यात आला आहे.
RURAL INDIA Innovation. It’s Amazing!! pic.twitter.com/rJAaGNpQh5
— Awanish Sharan 🇮🇳 (@AwanishSharan) September 23, 2022
हा व्हिडिओ एका आयएसएस अधिकाऱ्याला आवडल्याने त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या अधिकाऱ्याचे नाव अविनाश शरण असे असून त्यांनी या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये, हा ग्रामीण भारताचा (rural india) जुगाड असे म्हटले आहे. या व्हिडिओत पाहिल्यानंतर दिसेल की हे मशीन ट्रेडमिल सारखे दिसणारी मशीन आहे आणि ही मशीन पंपिंग सेटला जोडलेली आहे.
बैल या व्हिडिओत हे मशीन चालवताना दिसत आहे. तर दुसरीकडे या मशीन मधून पाणी बाहेर येताना दिसत आहे. हा संपूर्ण सेटअप एका शेता जवळ असल्याचे या व्हिडिओच्या मदतीने दिसून येत आहे. अशा पद्धतीचा जमिनीतून पाणी उपसण्याचा यंत्र पाहून सर्वांनी आश्चर्य व्यक्त केला आहे. काहींना हा जुगाड आवडला आहे. तर काहींनी यावर टीका देखील केली आहे. एका युजरने म्हटले की प्राण्यांवर अत्याचार का करत आहात. अशा पद्धतीच्या संमिश्र प्रतिक्रिया या व्हिडिओला मिळाल्या आहेत.
हे पण वाचा :
DJ च्या गाडीवर अचानक पसरला करंट; नाचता नाचता तरुणांची झाली भयंकर अवस्था
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात; शिवशाही बस पलटी होऊन खड्ड्यात
Jasprit Bumrah आशिया चषक स्पर्धेला मुकणार ? समोर आलं ‘हे’ मोठं कारण
सपाच्या जिल्हा अध्यक्षांच्या गाडीला अपघात थोडक्यात बचावले, थरारक Video आला समोर
भाजप प्रदेशाध्यक्षपदी आशिष शेलारांच्या नावाची चर्चा?? तर चंद्रकांत पाटलांना…