विश्व चषक २०१९ | भारताने विश्व चषक सामन्यात चांगलीच सुरुवात केली असून भारत या वर्षीच्या विश्व चषकाचा प्रबळदावेदार मानला जातो आहे. दक्षिण आफ्रिकेला मात दिल्या नात्र काल भारताने ऑस्ट्रेलियाच्या संघावर ३६ धावांनी विजय मिळवला. भारत आपला पुढचा सामना न्यूझीलंड विरोधात खेळणार आहे.
शिवसेना भाजपसाठी सवतीचे लेकरू? अमित शहांनी विधानसभेसाठी घेतली बैठक
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारचाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा-शिखर धवन यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर आणि शिखर धवनच्या 117 धावांची खेळी चर्चेत राहिली. तर विराट कोहलीच्या 82 धावांच्या आक्रमक खेळीनं सर्वांचे लक्ष वेधले. विराटनं आपल्या फलंदाजीनं ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची पुरती दाणद उडवली. मात्र या सामन्यात एक असा प्रसंग घडला ज्या प्रसंगामुळे विराटनं सर्वांचेच मन जिंकले. एवढेच नाही तर विराटनं सामन्यानंतर स्मिथची माफीही मागीतली.
Captain @imVkohli on THAT gesture that won hearts ???????? #TeamIndia #INDvAUS #SpiritOfCricket pic.twitter.com/irUtTtv6AR
— BCCI (@BCCI) June 9, 2019
अभिनेते गिरीश कर्नाड यांचे निधन
विराट कोहली फलंदाजी करत असताना भारतीय चाहत्यांनी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथ याला चीटर, चीटर म्हणण्यास सुरुवात केली. स्मिथचे हुटिंग पाहता विरट कोहलीनं भारतीय चाहत्यांना समज देत, स्मिथसाठी टाळ्या वाजवण्यास सांगितले.
पराभव पाहण्यापेक्षा मला मरण का आले नाही : चंद्रकांत खैरे
चेंडू कुरतडण्याप्रकणात शिक्षा पूर्ण करून राष्ट्रीय संघात कमबॅक करणाऱ्या स्मिथ व डेव्हिड वॉर्नरसाठी हुटिंगचा प्रकार नवीन नाही. याआधी सराव सामन्यातही त्याना चीटर चीटर असं संबोधित करण्यात आले होते. मात्र, भारत आणि ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या सामन्यात चाहते जाणीवपूर्वक स्मिथला डिवचत आहेत. पण, कोहलीनं चाहत्यांच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त केली आणि त्यांना स्मिथसाठी टाळ्या वाजवण्यास सांगितले. या प्रसंगानं स्मिथही भारावून गेला, आणि त्यानं कोहलीशी हस्तांदोलन केले. दरम्यान नेटेकरही विराटच्या या कृतीवर खुश आहेत.