मॅचेस बंद तरी, ICC टेस्ट रॅकिंगमध्ये टीम इंडियाची घसरण! मिळालं ‘हे’ स्थान..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दुबई । संपूर्ण जगाला कोरोनाने विळखा घातला आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे जवळपास संपूर्ण जग ठप्प आहे. याचा इतर क्षेत्रांबरोबरच क्रीडा क्षेत्राला सुद्धा बसला आहे. सर्व क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट स्पर्धांनाही ब्रेक लागला आहे. असे असताना टीम इंडियाला जबर धक्का बसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अर्थात आयसीसीने शुक्रवारी १ मे रोजी ताजी क्रमवारी जाहीर केली. आयसीसीने कसोटी, वनडे आणि टी-२० प्रकारातील क्रमवारी जाहीर केली असून ताज्या क्रमवारीत भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटच्या क्रमवारीत भारतीय संघाला खाली ढकलून अव्वल स्थान पटकावले. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत टीम इंडिया अव्वल स्थानी कायम आहे, पण गेली ४२ महिने म्हणजेच ऑक्टोबर २०१६ पासून अव्वल स्थानी असलेल्या टीम इंडियाला शुक्रवारी ऑस्ट्रेलियाने मागे टाकले.तर पाकिस्तान क्रिकेट संघाला टी-२० मधीलआपलं अव्वल स्थान गमवावे लागले आहे. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत कसोटी आणि टी-२० मध्ये ऑस्ट्रेलिया संघाने बाजी मारली आहे. याचसोबत गेल्यावर्षी आयसीसी वनडे वर्ल्ड कपचे विजेतेपद मिळवणाऱ्या इंग्लंड संघाला वनडे क्रमवारीत अव्वल स्थान मिळाले.

आयसीसीच्या वार्षिक क्रमवारीनुसार ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघाचे ११६ गुण आहेत. तर ११५ गुणांसह न्यूझीलंड दुसऱ्या तर १४४ गुणांसह भारत तिसऱ्या स्थानावर. वनडेत इंग्लंडचा संघ १२७ गुणांसह पहिल्या, ११९ गुणांसह टीम इंडिया दुसऱ्या तर ११६ गुणांसह न्यूझीलंड तिसऱ्या स्थानावर आहे. टी-२० क्रमवारीत ऑस्ट्रेलिया २६८ गुणांसह पहिल्या, इंग्लंड २६६ गुणांसह दुसऱ्या तर भारत २६६ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.

 

Leave a Comment